श्री देव भैरव उत्सव मंडळाचे आयोजन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ भैरववाडी येथील श्री देव भैरव-जोगेश्वरी यांच्या ३६ व्या वर्धापन दिना निमित्त श्री देव भैरव उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ‘केळीच्या सोपापासून बनवलेले सत्यनारायण महापूजेचे मखर बांधणी ‘ स्पर्धेत नेरुर येथील सुनिल मेस्री यांनी बनवलेल्या मखराला प्रथम क्रमांक मिळाला तर नेरुर येथीलच प्रविण मेस्री यांनी बनवलेल्या मखराला व्दितिय व पिंगुळी येथील प्रविण गंगावणे यांनी बनवलेल्या मखराला तृतीय क्रमांक मिळाला.
प्रथम उत्तेजनार्थ पावशी येथील दिनेश मुंज यांच्या तर व्दितीय उत्तेजनार्थ ओटवणे येथील आकाश मेस्री यांच्या मखराला प्राप्त झाला. या स्पर्धेत मंगेश अनंत बागवे, वायंवडे (मालवण), आबा नाईक – नेरूर (कवीलगाव), रोहीत कुबल – हळवल (कणकवली), मिलिंद वेंगुर्लेकर,बाव-कुडाळ, वेदांत विकास मेथर, माड्याचीवाडी-कुडाळ, राजन मेस्री नेरूर-कुडाळ यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून अनुक्रमे संदीप मोदन चिऊलकर, गुरुनाथ बाळकृष्ण मेस्री यांनी काम पाहिले.