बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले टांक येथील शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रेमी’ मित्रमंडळ’ यांच्या वतीने १८ फेब्रुवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टांक येथील मारुती मंदिरात सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शिवभक्तांनी आणि रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे प्रमुख मंदार चोपडेकर यांनी केले आहे.
टांक येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान यावर्षी आदल्या दिवशी याच मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त शिवभक्त व रक्तदात्यांनी सहभाग दर्शवावा, तसेच १९ फेब्रुवारीला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदार चोपडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मंदार चोपडेकर : ७०८३६४०७३२, ओमकार धुरी : ७०३०९९२७९३, अण्णा चोपडेकर : ८४१२८७५६०९, तुषार गवंडे : ९४०३३९७७९१, जगन्नाथ चोपडेकर : ८५५०९२०६९६ या क्रमांकांवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.