24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे संघटीत राहिलो तर काहीही अशक्य नाही : कुडाळ-मालवण युवतीसेना प्रमुख समन्वयक सौ.शिल्पा यतीन खोत .

- Advertisement -
- Advertisement -

आ.वैभव नाईक यांची संकल्पना असलेल्या शिवजयंती उत्सव सोहळ्याची केली घोषणा ; युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सवातील वेशभूषा स्पर्धेचे आयोजन.

मालवण तालुक्यातल्या मसुरे व हडी गावातील युवती सेना पदाधिकारी व पदांचा विस्तारही केला जाहीर.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या युवतीसेनेच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती तथा शिवजयंती सोहळा संपन्न होणार आहे. कुडाळ-मालवण युवतीसेना प्रमुख समन्वयक सौ शिल्पा यतीन खोत यांनी युवती सेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाची आखणी होत असून त्याला आमदार वैभव, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , मालवण शहरातील व तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवासेनेचे मार्गदर्शन सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. सौ.शिल्पा यतीन खोत यांनी आज संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर शाखेत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
याच दरम्यान त्यांनी मालवण तालुक्यातल्या मसुरे व हडी गावचा पदाधिकारी विस्तार जाहीर केला आणि युवतीसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी सौ. रुपा राजेश कुडाळकर यांचीही निवड झाल्याचे घोषीत केले. युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विस्तार केला गेल्याचे सांगताना त्यांनी प्रत्येक पदाधिकारी युवतीला आपले पद ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नूतन पदाधिकारी विस्तारात मसुरे विभाग युवती अधिकारी म्हणून आर्या अभय गांवकर यांची नियुक्ती झाली आहे आणि हडी शाखाप्रमुख दिक्षा दशरथ गांवकर, हडी उपशाखाप्रुख प्रज्ञा प्रकाश कदम, हडी बुथप्रमुख रिया राजन आचरेकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे संघटीत राहून आपल्या युवतीसेनेत राहीलो तर आपल्याला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्यविषयक,रोजगार विषयक आणि इतर सर्वच क्षेत्रात अशक्य काहीच नसेल असे सौ.शिल्पा यतीन खोत यांनी उपस्थित युवतीसेना पदाधिकारी व कार्यकर्त्या यांना संबोधीत करताना सांगितले.

यंदाच्या शिवजयंती सोहळ्याच्या एक आठवडा आधी आपल्याला ही पदांची जबाबदारी मिळाली आहे ती आपण आनंदाने पार पाडून जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करु असे मसुरे विभाग युवती अधिकारी आर्या अभय गांवकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनीही यादरम्यान दूरध्वनीवरुन सर्व नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
यावेळी मालवण नगरपरीषद माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत हेही उपस्थित होते. त्यांनी उपस्थित युवतीसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आ.वैभव नाईक यांची संकल्पना असलेल्या शिवजयंती सोहळ्याची सविस्तर माहिती घेऊन त्या सोहळ्याला मालवण शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सहकारी व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी हेही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत सौ.शिल्पा यतीन खोत यांच्यासह , युवतीसेना मालवण तालुका प्रमुख मिनाक्षी शिंदे, नूतन मालवण तालुका युवतीसेना उपतालुकाप्रमुख रुपा राजेश कुडाळकर, मसुरे विभाग युवती अधिकारी आर्या अभय गांवकर , उपतालुकाप्रमुख अंजना सामंत , हडी शाखाप्रमुख दिक्षा गांवकर , हडी, उपशाखाप्रुख प्रज्ञा कदम, हडी बुथप्रमुख रिया राजन आचरेकर, शाखाप्रमुख विद्या फर्नांडिस , शाखाप्रमुख मंदा जोशी, दिपाली पवार, मालवण प्रभाग ४ शाखाप्रमुख दिया पवार, उपशाखाप्रुख नंदा सारंग, संतोष अमरे, सिद्धू मांजरेकर,सुरेश मडये आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!