बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा नटवाचनालयात , ख्यातनाम साहित्यीक गुरूवर्य कै. प्र.श्री नेरूरकर यांची जयंती मंगळवारी १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ४.०० वाजता साजरी करण्यात येणार आहे. गेली १० वर्षे हा कार्यक्रम बांदा नट वाचनालयाच्या वतीने साजरा करून कै.प्र.श्री नेरूरकर यांच्या आठवणीना उजाळा दिला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी चांगल्या साहित्यिकाला कै. प्र.श्री. नेरुरकर पुरस्कार बांदा वाचनालयाच्या वतीने दिला जातो.
यंदाचा हा पुरस्कार सामाजिक साहित्यीक व मनोविकार तज्ञ तसेच बांदा गांवचे सुपुत्र डाॅ. रूपेश आनंद पाटकर याना जाहीर झाला असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सन्मानीत केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व साहित्य प्रेमी व कै.प्र.श्री.च्या विद्यार्थ्यांनी आणि बांदा वासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन बांदा नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी केले आहे.