25.3 C
Mālvan
Sunday, November 10, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

नेरूरमधील ज्येष्ठ ‘रंगमहर्षी’ व सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. बाळ करलकर कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

नेरूर । देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर या कलावंतांच्या गांवातील नाट्यकर्मी आणि आपल्या भारदस्त पहाडी आवाजाने भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्री. बाळ करलकर यांचे ५ फेब्रुवारीला रात्री ०८:३० च्या सुमारास निधन झाले.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रंगभूमी व रंगदेवतेची सेवा केली.पांढरा सदरा, पांढरा लेंगा, डोक्यावरती हॅट्, चेह-यावर स्मितहास्य व त्यांचे भारदस्त असे व्यक्तिमत्व बहुतांश जिल्हा वासियांसाठी व कला व सामाजिक क्षेत्रात सुपरिचित होते.

या अत्याधुनिक वाहनांच्या काळात वृद्धावस्थेतही ते कित्येक मैलांचा प्रवास त्यांच्या सायकलने करत असत. या ज्येष्ठ रंगमहर्षीच्या जाण्याने कलाक्षेत्राने एक हक्काचा ‘ज्येष्ठ मार्गदर्शक’ गमावल्याची भावना नाट्य व भजनरसिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधना नंतर ओंकार मित्रमंडळ, वाघचौडी नेरुर यांच्यातर्फे विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नेरूर । देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर या कलावंतांच्या गांवातील नाट्यकर्मी आणि आपल्या भारदस्त पहाडी आवाजाने भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्री. बाळ करलकर यांचे ५ फेब्रुवारीला रात्री ०८:३० च्या सुमारास निधन झाले.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रंगभूमी व रंगदेवतेची सेवा केली.पांढरा सदरा, पांढरा लेंगा, डोक्यावरती हॅट्, चेह-यावर स्मितहास्य व त्यांचे भारदस्त असे व्यक्तिमत्व बहुतांश जिल्हा वासियांसाठी व कला व सामाजिक क्षेत्रात सुपरिचित होते.

या अत्याधुनिक वाहनांच्या काळात वृद्धावस्थेतही ते कित्येक मैलांचा प्रवास त्यांच्या सायकलने करत असत. या ज्येष्ठ रंगमहर्षीच्या जाण्याने कलाक्षेत्राने एक हक्काचा 'ज्येष्ठ मार्गदर्शक' गमावल्याची भावना नाट्य व भजनरसिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधना नंतर ओंकार मित्रमंडळ, वाघचौडी नेरुर यांच्यातर्फे विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

error: Content is protected !!