25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आचारसंहिता संपताच ग्रामपंचायत सदस्य काळे दांपत्य ‘बॅक इन ॲक्शन…!’

- Advertisement -
- Advertisement -

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी दिले निवेदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे-शिराळे ग्रामपंचायतचे पुनर्निर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे आणि त्यांच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या पत्नी सौ.विशाखा नवलराज काळे या दांपत्याने आचारसंहीतेचा कालावधी संपताच त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा धडाका सुरु केला आहे.

सध्या ‘मानव विकास योजना’ या अंतर्गत चालू असलेली सकाळची गाडी शिराळे गावा पर्यंत सोडावी आणि शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशा संबंधी ग्रा.पं. सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे नुकतीच लागू असलेली आचारसंहिता संपताच काळे दांपत्ये यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडचणी जाणून घेत सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वाहतूक विभागीय कार्यालय कणकवली येथे मानव विकास योजनेअंतर्गत चालू असलेली वैभववाडी सडूरे ही गाडी शिराळे गावात सोडावी व शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

श्री नवलराज विजयसिंह काळे हे प्रभाग तीन चे ग्रामपंचायत सदस्य आहेत तर सौ.विशाखा नवलराज काळे ह्या प्रभाग क्रमांक दोनच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत या दोन्ही प्रभागात येणाऱ्या शिराळे गावा सहित इतर ३ वाड्यातील विद्यार्थ्यांना सकाळी नऊची एसटी सडूरेतून जात असल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून सडूरे येथे गाडीसाठी यावे लागते व तसे न केल्यास दुसऱ्या गाडीने कॉलेजला जावयाचे असल्यास कॉलेजला जायला उशीर होतो. परिणामी सुरुवातीचे एक दोन लेक्चर्स विद्यार्थ्यांना मिळत नाही. काहींचे एक्स्ट्रा क्लासेस असतात त्यांना सुद्धा हजेरी लावता येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे शैक्षणिक नुकसान वाचवायचे असल्यास मानव विकास योजनेंतर्गत चालू असलेली सकाळी ९ वाजताची बस ही व्हाया शिराळे गावातून वैभववाडीला जावी अशी त्यांची मागणी आहे. तसे झाल्यास नियोजित वेळेत विद्यार्थी आपल्या कॉलेजला पोहोचू शकतात.

ही बस चालू करण्यासाठी शिराळे सहित उर्वरित ३ वाड्यांतील जनतेची आपल्याकडे सातत्याने मागणी होत आहे व जनतेच्या वतीने आम्ही आपल्या विभागाकडे ही गाडी चालू करण्याची विनंती करीत आहोत अशा आशयाचे निवेदन ४ फेब्रुवारी २०२३ ला ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे व सौ विशाखा काळे यांनी ट्राफिक डिव्हिजन कणकवली कार्यालयात लिखित स्वरूपात दिले आहे. निश्चितपणाने गाडी चालू झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले वाचेल. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी दिले निवेदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे-शिराळे ग्रामपंचायतचे पुनर्निर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे आणि त्यांच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या पत्नी सौ.विशाखा नवलराज काळे या दांपत्याने आचारसंहीतेचा कालावधी संपताच त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा धडाका सुरु केला आहे.

सध्या 'मानव विकास योजना' या अंतर्गत चालू असलेली सकाळची गाडी शिराळे गावा पर्यंत सोडावी आणि शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशा संबंधी ग्रा.पं. सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे नुकतीच लागू असलेली आचारसंहिता संपताच काळे दांपत्ये यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडचणी जाणून घेत सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वाहतूक विभागीय कार्यालय कणकवली येथे मानव विकास योजनेअंतर्गत चालू असलेली वैभववाडी सडूरे ही गाडी शिराळे गावात सोडावी व शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

श्री नवलराज विजयसिंह काळे हे प्रभाग तीन चे ग्रामपंचायत सदस्य आहेत तर सौ.विशाखा नवलराज काळे ह्या प्रभाग क्रमांक दोनच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत या दोन्ही प्रभागात येणाऱ्या शिराळे गावा सहित इतर ३ वाड्यातील विद्यार्थ्यांना सकाळी नऊची एसटी सडूरेतून जात असल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून सडूरे येथे गाडीसाठी यावे लागते व तसे न केल्यास दुसऱ्या गाडीने कॉलेजला जावयाचे असल्यास कॉलेजला जायला उशीर होतो. परिणामी सुरुवातीचे एक दोन लेक्चर्स विद्यार्थ्यांना मिळत नाही. काहींचे एक्स्ट्रा क्लासेस असतात त्यांना सुद्धा हजेरी लावता येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे शैक्षणिक नुकसान वाचवायचे असल्यास मानव विकास योजनेंतर्गत चालू असलेली सकाळी ९ वाजताची बस ही व्हाया शिराळे गावातून वैभववाडीला जावी अशी त्यांची मागणी आहे. तसे झाल्यास नियोजित वेळेत विद्यार्थी आपल्या कॉलेजला पोहोचू शकतात.

ही बस चालू करण्यासाठी शिराळे सहित उर्वरित ३ वाड्यांतील जनतेची आपल्याकडे सातत्याने मागणी होत आहे व जनतेच्या वतीने आम्ही आपल्या विभागाकडे ही गाडी चालू करण्याची विनंती करीत आहोत अशा आशयाचे निवेदन ४ फेब्रुवारी २०२३ ला ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे व सौ विशाखा काळे यांनी ट्राफिक डिव्हिजन कणकवली कार्यालयात लिखित स्वरूपात दिले आहे. निश्चितपणाने गाडी चालू झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले वाचेल. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल .

error: Content is protected !!