23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वर्षभराची रख़वाली ‘श्री देवी भराडी जत्रा..!’

- Advertisement -
- Advertisement -

देवी भराडी नटली सजली,
भक्त जनांच्या भेटीसाठी,
भक्त जनांचा मेळा जमला,
आई भराडीच्या दर्शनासाठी ||


नेत्र भरून ते दर्शन घ्यावे,
मनोकामना पूर्ण व्हावे,
आईच्या दरबारा मध्ये,
नसे कशाची कधी खंत ||


लाखो भाविक दुरुनी येती,
रांगे मध्ये उभे राहती,
शांत मनाने तल्लीन होती
दर्शन घेऊन पुढे सरकती ||


जत्रा मग ती फुलून जाई,
खाजा लाडू उसळ मिठाई
वडे सागोती कांदा भजी ती,
चाकरमानी ताव मारीती ||


शेतकरी अवजारे घेती,
महिलांची ती खरेदीत घाई,
बांगड्या टिकल्या कपडे घेई,
बालकांमध्ये उत्साह भारी ,
पाळणा चक्री घेई भरारी ||


आंगणे मंडळीचा प्रसाद येता,
भक्तांची ती झुंबड उडते,
एका एका कणासाठी,
चातका सारखे दाणे टिपती ||


अशी असे ही देवी महती,
दश दिशांनी भक्त जमती,
प्रसाद घेऊन पुन्हा परतती,
वर्ष भराची रख़वाली घेती ||

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवी भराडी नटली सजली,
भक्त जनांच्या भेटीसाठी,
भक्त जनांचा मेळा जमला,
आई भराडीच्या दर्शनासाठी ||


नेत्र भरून ते दर्शन घ्यावे,
मनोकामना पूर्ण व्हावे,
आईच्या दरबारा मध्ये,
नसे कशाची कधी खंत ||


लाखो भाविक दुरुनी येती,
रांगे मध्ये उभे राहती,
शांत मनाने तल्लीन होती
दर्शन घेऊन पुढे सरकती ||


जत्रा मग ती फुलून जाई,
खाजा लाडू उसळ मिठाई
वडे सागोती कांदा भजी ती,
चाकरमानी ताव मारीती ||


शेतकरी अवजारे घेती,
महिलांची ती खरेदीत घाई,
बांगड्या टिकल्या कपडे घेई,
बालकांमध्ये उत्साह भारी ,
पाळणा चक्री घेई भरारी ||


आंगणे मंडळीचा प्रसाद येता,
भक्तांची ती झुंबड उडते,
एका एका कणासाठी,
चातका सारखे दाणे टिपती ||


अशी असे ही देवी महती,
दश दिशांनी भक्त जमती,
प्रसाद घेऊन पुन्हा परतती,
वर्ष भराची रख़वाली घेती ||

error: Content is protected !!