29.7 C
Mālvan
Tuesday, April 22, 2025
IMG-20240531-WA0007

शेर्ले-मडुरा-सातार्डा रस्त्याचे मंजूर झालेले काम सा.बां. विभागाकडून सुरू करायला दिरंगाई होत असल्याने आंदोलन करणार ; मडुरे उपसरपंच बाळू गावडेंचा लेखी इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) व्हाया शेर्ले-मडुरा-सातार्डा’ या रस्त्याचे काम शासनदरबारी मंजूर झालेले आहे तरिही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. हे मंजूर काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा १५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.

मडुरा रेखवाडी येथे रस्ता दुरुस्तीचे किरकोळ काम सुरू आहे. परंतु ‘खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) ते वाया शेर्ले-मडुरा-सातार्डा’ रस्त्याचे काम मंजूर असून सार्वजनिक विभागाकडून दिरंगाई का होत आहे. निधीची तरतूद करण्यासाठी आम्हाला अनेक फेऱ्या आमदार, खासदार तसेच मंत्र्यांकडे माराव्या लागतात. त्याचवेळी आम्ही गावात निधी आणू शकतो, मात्र आणलेला निधी योग्य वेळेत खर्च होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सदर रस्त्याचे काम मंजूर असून काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्ष काम सुरु करायची कार्यवाहीची हमी ८ दिवसांत लेखी स्वरुपात न मिळाल्यास १५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे गावातील नागरिक तसेच परिसरातील सहकाऱ्यांसोबत बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशाराही उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला.

यावेळी कुठलाही अनुचित् प्रकार घडला किंवा आरोग्याला हानी पोचली तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) व्हाया शेर्ले-मडुरा-सातार्डा' या रस्त्याचे काम शासनदरबारी मंजूर झालेले आहे तरिही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. हे मंजूर काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा १५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.

मडुरा रेखवाडी येथे रस्ता दुरुस्तीचे किरकोळ काम सुरू आहे. परंतु 'खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) ते वाया शेर्ले-मडुरा-सातार्डा' रस्त्याचे काम मंजूर असून सार्वजनिक विभागाकडून दिरंगाई का होत आहे. निधीची तरतूद करण्यासाठी आम्हाला अनेक फेऱ्या आमदार, खासदार तसेच मंत्र्यांकडे माराव्या लागतात. त्याचवेळी आम्ही गावात निधी आणू शकतो, मात्र आणलेला निधी योग्य वेळेत खर्च होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सदर रस्त्याचे काम मंजूर असून काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्ष काम सुरु करायची कार्यवाहीची हमी ८ दिवसांत लेखी स्वरुपात न मिळाल्यास १५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे गावातील नागरिक तसेच परिसरातील सहकाऱ्यांसोबत बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशाराही उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला.

यावेळी कुठलाही अनुचित् प्रकार घडला किंवा आरोग्याला हानी पोचली तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

error: Content is protected !!