पद्मावती स्वयंम सहाय्यता समुहाच्या अध्यक्षा सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बांदा | राकेश परब : ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनच आज या पदापर्यंत पोहचलो. ३२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मुख्याध्यापक या पदावर काम करून सेवानिवृत्त झालो. आज आपल्या घराच्या माणसांकडून झालेल्या सत्कारामुळे आपण भारावून गेलो आहोत व या शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यामागे आपल्या सुविद्य पत्नीचावतदा सौभाग्यवतीचा मोठा वाटा असल्याचे मडुरे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
श्री दशरथ घाडी यांचा सत्कार कार्यक्रम व सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर सरपंच बांदा सौ.प्रियांका नाईक, उपसरपंच बांदा जावेद ख़तिब, माजी जि.प.सदस्या सौ. श्वेता कोरगांवकर, माजी सरपंच दिपक सावंत, संदिप बांदेकर, अभय सातार्डेकर, राजाराम म्हावळणकर, माजी ग्रा.पं सदस्यां ,सौ.अनुजा सातार्डेकर, सौ.लक्ष्मी सावंत, गुरूनाथ सावंत, उपस्थित होते.
यावेळी श्री.दशरथ घाडी यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पद्मावती स्वयंम सहाय्यता समुह च्या अध्यक्षा सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस सुद्धा या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यांना उपस्थित सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रविण कळगुंटकर, प्रमोद कळगुंटकर, म्हावळणकर, विठ्ठल कळगुंटकर, राकेश परब, उमेश झाट्ये, सुप्रभा गावडे, पूर्णलेखा म्हावळणकर, सोहम् सावंत, पार्थ, नेमण, शिवम् गावडे उपस्थीत होते. या अनोख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी डिंगणे सरपंच श्री. नाना सावंत तर आभार प्रमोद कळगुंटकर यांनी मानले.