29.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर ; आ.वैभव नाईक आणि शिवसेनेच्या सहकार्यांच्या प्रयत्नांतून ४३ कोटींची नळपाणी योजना आल्याचे केले स्पष्ट.

- Advertisement -
- Advertisement -

माजी नगरसेवक व गटनेते गणेश कुशे यांना त्यांच्या प्रभागातील जनतेशी आमना-सामना करायचा दिला सल्ला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषदेतील माजी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. माजी नगरसेवक व माजी गटनेते गणेश कुशे यांनी मागील सत्ताधारी व माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी व आ.वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते . त्यावर मंदार केणी यांनी चौफेर असे प्रत्युत्तर देताना म्हणले आहे की मालवण शहरासाठी ३० वर्षांपूर्वीच्या धामापूर नळयोजने द्वारे पाणी पुरवठा होत होता.

मालवण नगरपरिषदेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ४३ कोटींची नळयोजना मंजूर झाली.अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरु असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नळयोज़ना आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या नळ योजनेची तर सुरवातच झालेली नाही. मात्र अशावेळी मालवण नगरपरिषदेच्या नळयोजनेची निविदा प्रक्रिया सुरु झाली हे शिवसेनेचे यश आहे. ही निविदा पारदर्शक स्वरूपाची आहे. त्यामुळे गणेश कुशे यांनी माझ्यावर व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याअगोदर मालवण शहरासाठी आपले काय योगदान आहे याचा बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा .

नळ योजनेबाबत माहिती देताना मंदार केणी पुढे म्हणले की मालवण नळ पाणी योजनेचे २८ कोटीचे टेंडर एम जी पी कडे चार वेळा रिटेंडर झाले ती निविदा ७०% जागा दराची निविदा आल्याने ते टेंडर रद्द करून ही योजना नगर परिषदेकडे हस्तांतर करण्यात आली त्यामुळे नगर परिषदेकडे नव्याने केलेल्या डी पी आर मध्ये ही योजना ५३ कोटीची झाली नंतर ज्यावेळी ही योजना तांत्रिक मंजुरीसाठी एमजीपी ऑफिस ठाणे यांच्याकडे गेली. त्या ठिकाणी बरीचशी नळ पाणी योजनेची लाईन ही डोंगरातून येत असल्याने एम एस पाईप ऐवजी डी आय पाईप पकडल्यास सोयीस्कर होईल म्हणून त्या ठिकाणी डी आय पाईप पकडण्यात आले त्यामध्ये एम एस पाईप डी आय पाईप यातील दराची तफावत यामुळे त्या ठिकाणी तब्बल ५ कोटी रुपये हे कमी झाले

तसेच धामापूर तलावातील विहीर तलावात पकडण्यात आली होती त्या ठिकाणी ‘वेटलँड तथा पाणथळ भूमी’ घोषीत करत असल्याने त्या ठिकाणची विहीर रद्द करण्यात आली. त्यामध्ये किमान ३ कोटी हे कमी झाले. त्यामुळे या योजनेतील जवळजवळ दहा कोटीचा फरक कमी झाल्याने ही योजना ४३ कोटींची झाली. त्यामुळे जेवढा विलंब योजना होण्यास किंवा टेंडर होण्यास त्या ठिकाणी होतो त्यावेळी डीएसआर प्रमाणे त्या योजनेतील पाईपचे दर असतील किंवा इतर गोष्टींचे डीएसआर हे बदलत असतात मग त्या डीएसआर प्रमाणे योजनेपूर्वी किंवा टेंडर झाल्यानंतर ते इस्टिमेट रिवाईज केले जाते त्यामुळे योजनेचे निविदेची रकमेमध्येही फरक होत असतो.

मालवण शहराच्या महत्त्वाच्या व नव्याने होणाऱ्या नळपाणी योजनेशी माजी गटनेते गणेश कुशे यांना कोणतेही सोयरसुतक नाही . ज्यांना काही योजनांशी देणे घेणे नसते परंतु सभागृहात कॉन्ट्रॅक्टर ‘हॅरॅस्मेंट’ कशी करावी आणि स्टॅंडिंग मध्ये आलेल्या टेंडरना आपल्या आर्थिक गणितांसाठी अडवण्याचे काम गणेश कुशे यांनी गेली ५ वर्ष केले. त्यांना कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी तर व्हि.आर.एस निवृत्तीही घ्यायची ठरवली. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचीही हॅरिसमेंट गणेश कुशे त्यांच्या सोबतच्यांनी केली असा गंभीर आरोप मंदार केणी यांनी केला आहे.

डीपी आर बनवला नाही तर योजना कुठून होणार त्यामुळे गणेश कुशे हे लोकांची दिशाभूल करायचे काम करत आहेत आमचा विरोध डीपी आर ला होता पण नळपाणी योजनेला नव्हता असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम गणेश कुशे करत आहेत. आराखडा बनविणाऱ्या माची या व्यक्तींची मागील बिलाच्या वेळी आर्थिक गणितासाठी धमकी देऊन पाठ पकडल्यानेच गणेश कुशे आणि त्यांच्या कंपूच्या भीतीनेच श्री. माची हे नगर परिषदेमध्ये येण्यास घाबरत होते. माचींशी ‘सेटलमेंट’ न झाल्यानेच डीपीआर रद्द करण्याचा गणेश कुशींचे षडयंत्र होते आणि विरोधी ठरावाने ते उघडे पडले जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठरावाच्या विरोधात मांडलेली उपसूचना घेऊन जाण्याचा प्रयत्न गणेश कुशेंनी केला असेल पण त्यांचा उद्देश हा वरिष्ठांना खूश करण्यासाठी त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचा होता योजना होण्यासाठी हेतू असता तर त्यांना त्या ठिकाणी इस्टिमेट मधील त्रुटी काढण्याचे काम सुद्धा करता आले असते. त्यामुळे फायर स्टेशन, मच्छी मार्केट ही काम चालू आहेत मालवण नगरपालिकेत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण शहरासाठी अग्निशामक बंब आला आहे त्यामुळे स्वतःची आर्थिक गणिते न जुळल्यास ती काम कशा पद्धतीने बंद पाडायची याचे उदाहरण म्हणजे मालवण शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे.

गणेश कुशे यांच्या याच वृत्तीमुळे त्यांना नगरपालिकेमध्ये कोणीही कर्मचारी विचारत नाही आणि प्रभागातही लोक आता त्यांची उचल बांगडी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकांना कर्मचारी महत्व देतात मानसन्मान देतात हे शहरातील विकास कामांसाठी त्यांच्या असलेल्या तळमळीमुळेच. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आर्थिक गणितांसाठी जे नगरपालिकेत वावरत होते त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नगरपरिषदेत कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांना विचारत नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.

गणेश कुशे यांनी स्वतःच्या प्रभागातील जनतेशी आमने-सामने करा आणि नंतरच आमच्याशी आमने सामने करण्याची भाषा करा असा सल्लाही मंदार केणी यांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माजी नगरसेवक व गटनेते गणेश कुशे यांना त्यांच्या प्रभागातील जनतेशी आमना-सामना करायचा दिला सल्ला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषदेतील माजी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. माजी नगरसेवक व माजी गटनेते गणेश कुशे यांनी मागील सत्ताधारी व माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी व आ.वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते . त्यावर मंदार केणी यांनी चौफेर असे प्रत्युत्तर देताना म्हणले आहे की मालवण शहरासाठी ३० वर्षांपूर्वीच्या धामापूर नळयोजने द्वारे पाणी पुरवठा होत होता.

मालवण नगरपरिषदेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ४३ कोटींची नळयोजना मंजूर झाली.अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरु असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नळयोज़ना आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या नळ योजनेची तर सुरवातच झालेली नाही. मात्र अशावेळी मालवण नगरपरिषदेच्या नळयोजनेची निविदा प्रक्रिया सुरु झाली हे शिवसेनेचे यश आहे. ही निविदा पारदर्शक स्वरूपाची आहे. त्यामुळे गणेश कुशे यांनी माझ्यावर व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याअगोदर मालवण शहरासाठी आपले काय योगदान आहे याचा बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा .

नळ योजनेबाबत माहिती देताना मंदार केणी पुढे म्हणले की मालवण नळ पाणी योजनेचे २८ कोटीचे टेंडर एम जी पी कडे चार वेळा रिटेंडर झाले ती निविदा ७०% जागा दराची निविदा आल्याने ते टेंडर रद्द करून ही योजना नगर परिषदेकडे हस्तांतर करण्यात आली त्यामुळे नगर परिषदेकडे नव्याने केलेल्या डी पी आर मध्ये ही योजना ५३ कोटीची झाली नंतर ज्यावेळी ही योजना तांत्रिक मंजुरीसाठी एमजीपी ऑफिस ठाणे यांच्याकडे गेली. त्या ठिकाणी बरीचशी नळ पाणी योजनेची लाईन ही डोंगरातून येत असल्याने एम एस पाईप ऐवजी डी आय पाईप पकडल्यास सोयीस्कर होईल म्हणून त्या ठिकाणी डी आय पाईप पकडण्यात आले त्यामध्ये एम एस पाईप डी आय पाईप यातील दराची तफावत यामुळे त्या ठिकाणी तब्बल ५ कोटी रुपये हे कमी झाले

तसेच धामापूर तलावातील विहीर तलावात पकडण्यात आली होती त्या ठिकाणी 'वेटलँड तथा पाणथळ भूमी' घोषीत करत असल्याने त्या ठिकाणची विहीर रद्द करण्यात आली. त्यामध्ये किमान ३ कोटी हे कमी झाले. त्यामुळे या योजनेतील जवळजवळ दहा कोटीचा फरक कमी झाल्याने ही योजना ४३ कोटींची झाली. त्यामुळे जेवढा विलंब योजना होण्यास किंवा टेंडर होण्यास त्या ठिकाणी होतो त्यावेळी डीएसआर प्रमाणे त्या योजनेतील पाईपचे दर असतील किंवा इतर गोष्टींचे डीएसआर हे बदलत असतात मग त्या डीएसआर प्रमाणे योजनेपूर्वी किंवा टेंडर झाल्यानंतर ते इस्टिमेट रिवाईज केले जाते त्यामुळे योजनेचे निविदेची रकमेमध्येही फरक होत असतो.

मालवण शहराच्या महत्त्वाच्या व नव्याने होणाऱ्या नळपाणी योजनेशी माजी गटनेते गणेश कुशे यांना कोणतेही सोयरसुतक नाही . ज्यांना काही योजनांशी देणे घेणे नसते परंतु सभागृहात कॉन्ट्रॅक्टर 'हॅरॅस्मेंट' कशी करावी आणि स्टॅंडिंग मध्ये आलेल्या टेंडरना आपल्या आर्थिक गणितांसाठी अडवण्याचे काम गणेश कुशे यांनी गेली ५ वर्ष केले. त्यांना कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी तर व्हि.आर.एस निवृत्तीही घ्यायची ठरवली. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचीही हॅरिसमेंट गणेश कुशे त्यांच्या सोबतच्यांनी केली असा गंभीर आरोप मंदार केणी यांनी केला आहे.

डीपी आर बनवला नाही तर योजना कुठून होणार त्यामुळे गणेश कुशे हे लोकांची दिशाभूल करायचे काम करत आहेत आमचा विरोध डीपी आर ला होता पण नळपाणी योजनेला नव्हता असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम गणेश कुशे करत आहेत. आराखडा बनविणाऱ्या माची या व्यक्तींची मागील बिलाच्या वेळी आर्थिक गणितासाठी धमकी देऊन पाठ पकडल्यानेच गणेश कुशे आणि त्यांच्या कंपूच्या भीतीनेच श्री. माची हे नगर परिषदेमध्ये येण्यास घाबरत होते. माचींशी 'सेटलमेंट' न झाल्यानेच डीपीआर रद्द करण्याचा गणेश कुशींचे षडयंत्र होते आणि विरोधी ठरावाने ते उघडे पडले जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठरावाच्या विरोधात मांडलेली उपसूचना घेऊन जाण्याचा प्रयत्न गणेश कुशेंनी केला असेल पण त्यांचा उद्देश हा वरिष्ठांना खूश करण्यासाठी त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचा होता योजना होण्यासाठी हेतू असता तर त्यांना त्या ठिकाणी इस्टिमेट मधील त्रुटी काढण्याचे काम सुद्धा करता आले असते. त्यामुळे फायर स्टेशन, मच्छी मार्केट ही काम चालू आहेत मालवण नगरपालिकेत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण शहरासाठी अग्निशामक बंब आला आहे त्यामुळे स्वतःची आर्थिक गणिते न जुळल्यास ती काम कशा पद्धतीने बंद पाडायची याचे उदाहरण म्हणजे मालवण शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे.

गणेश कुशे यांच्या याच वृत्तीमुळे त्यांना नगरपालिकेमध्ये कोणीही कर्मचारी विचारत नाही आणि प्रभागातही लोक आता त्यांची उचल बांगडी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकांना कर्मचारी महत्व देतात मानसन्मान देतात हे शहरातील विकास कामांसाठी त्यांच्या असलेल्या तळमळीमुळेच. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आर्थिक गणितांसाठी जे नगरपालिकेत वावरत होते त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नगरपरिषदेत कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांना विचारत नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.

गणेश कुशे यांनी स्वतःच्या प्रभागातील जनतेशी आमने-सामने करा आणि नंतरच आमच्याशी आमने सामने करण्याची भाषा करा असा सल्लाही मंदार केणी यांनी दिला आहे.

error: Content is protected !!