24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सरमळकर ‘दुखावलेत की पेटून उठलेत अशा चर्चेला उधाण ; सरमळकरांचे ‘आप’ मध्ये जायचे संकेत.

- Advertisement -
- Advertisement -

बहुतांश सामाजिक चळवळी आणि कलेमधील गट तट तसेच सर्वसमावेशक विचारांची उपेक्षा होत असल्याची केली टीका ; थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांचा बाजार होत असल्याची सरमळकरांची प्रसिद्धीपत्राद्वारे खंत.

होमलेस इन माय लॅन्ड ‘ अशा उपेक्षेतही आपण करुणेची याचना करत नाही असे सरमळकरांचे प्रतिपादन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या सरमळे येथील नाट्यकर्मी,कवी, लेखक, दिग्दर्शक व सामाजिक चळवळीतले विचारक श्री अनिल सरमळकर हे ‘आम आदमी’ पक्षात जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे सूचीत केले आहे.

गेली २० वर्षे ते नाट्यचळवळीशी निगडीत आहेत. गेली ३ वर्षे फाॅक्स या नाट्य पुस्तकामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्यकर्मींच्या चर्चेचाही ते आवडता विषय बनलेत. युरोपातील काही विद्यापीठांतील बुद्धीमंतांनी त्यांना ‘आंबेडकर इन आर्टस्’ असे संबोधले आहे.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे नाटककार, कवी लेखक दिग्दर्शक आणि सामाजिक परिवर्तन चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते वक्ते अशी ओळख असणार्या डॉ. अनिल सरमळकर यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले की आजच्या घडीला सामाजिक व्यवस्था बदलाच्या प्रकीयेत ‘आम आदमी पक्ष’ सर्वात निष्पक्ष वस्तुनिष्ठ कार्य करत आहे आणि जिथे सारासार व वास्तवाला धरुन जगायची ताकद आहे तिथे आपण आपोआपच आकर्षीत होतो. सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने दिर्घ विचाराअंती आपण हा निर्णय घेऊनच राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नविन निर्णयानुसार ‘ आम आदमी पक्ष हाच एकमेव समाज सक्षम राजकीय पर्याय आपल्याला दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आजचा काळ हा लोकशाहीसाठी अत्यंत आव्हानात्मक असुन सामान्य जनतेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक भयंकर असे अराजक देशाला ग्रासत असताना समाज जिवनात राजकीय सत्तेच्या आधारे सामाजिक परिवर्तन आणणारा पक्ष म्हणुन मला आम आदमी पक्ष योग्य वाटतो त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि आदर्श नेते अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. त्यांच्यासारखेच लोकनेते आज देशासाठी दिलासा आहेत आणि आशा आहेत असे अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे.
मात्र अद्याप प्रवेश तारीख व तांत्रिक बाबी सुनिश्चित झाल्या नसून मात्र त्या दिशेने आपले विचार कधीच सुरु झाले होते व याबाबत विभागीय स्थानिक,राज्यस्तरीय तसेच काही राष्ट्रीय नेतृत्व आपल्या संपर्कात असून महत्वाची वैचारीक चर्चा दीर्घकाळ सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दलित चळवळ, इतर बहुतांश सामाजिक प्रकल्प उपक्रम व चळवळी , साहित्य , कला क्षेत्रातील गट तट आणि राजकीय दुकानदारी करणारे व सन्माननीय डाॅ. आंबेडकर व इतर थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांचा व्यवसाय करणारे भुरटे लोक यांना कंटाळून आपण कधीच कोणत्याही राजकीय पक्षात संघटनेत सहभागी झालो नव्हतो असे प्रसिद्धपत्रात नमूद करताना अनिल सरमळकर यांनी दलित समाजकारण राजकारण सांस्कृतिकतेत आलेली कुंठितवस्था आणि स्थितीशिलता आणि नेते आणि कार्यकर्त्यांचा पराकोटीचा स्वार्थ आणि संकुचित विचार यामुळेच दलित चळवळ उध्वस्त अवस्थेत आली आहे अशी त्यांची वैयक्तिक मताची व्यथा मांडली आहे. सजग आणि व्यापक विचार परिपेक्ष विचार मांडणार्या अनिल सरमळकर या तरूण लेखकाची उपेक्षा दलित साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रवाहातील संकुचित विकृत लोकांनी नेहमी केली व ती सुरुच आहे असा आरोप करत त्यांनी अनिल सरमळकर यांचे लेखन जागतिक स्तरावर पोहचल्यावरच ते प्रकाशात आले असा टोला लगावला आहे. आपण ‘होमलेस इन माय लॅन्ड’ अशा जाणीवेत जगत व सहन करत येऊनही स्वतःला कधीच करुणामय दृष्टीने पाहत नाही व तशी याचनाही करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्याला अभिप्रेत असणारे व्यापक विचार मांडण्यासाठी माझ्याकडे लेखणी आहे मात्र सामान्य लोकांसाठी काही प्रत्यक्ष कार्यही माझ्या हातुन व्हावे यासाठी माझा पिंड राजकीय नसूनही मी जास्तीत जास्त आदर्श देश हितकारक तत्वे असणाऱ्या ‘ आम आदमी पक्षाची आणि नेता म्हणुन आदरणीय अरविंदभाई केजरीवाल यांनाचा प्राथमिकता देइन असे संपर्क साधला असता अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे. हा निर्णय घ्यायचाच होता मात्र त्या आधी आपण ‘ द न्यू रिपब्लिक ऑफ इंडिया’ ही संकल्पना मांडली असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्याच्या नव्या शक्यता आणि त्याचे पुनर्चिंतन करु पाहणारा समिक्षेचा ‘रिरायटींग ऑफ आंबेडकर’ हा महाप्रकल्प सुरु आहे. असहाय्य व गरजू जनतेसाठी थोडेफार ठोस व प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी एका जास्त व्यापक मंचाची आवश्यकता भासेल म्हणुनच आपण राजकीय दिशेने विचार करणे योग्य समजतो असेही डॉ. अनिल सरमळकर म्हणाले.

एक सर्जनशील लेखक व नाट्यकर्मी अचानक् राजकीय प्रवेशाचे संकेत देत थेट त्यांच्या पक्षाच्या निवडीबद्दल जाहीर भाष्य करुन गेल्याने जिल्ह्यातील अनेक चळवळी व राजकीय पक्षांमध्ये तसेच नाट्य व साहित्य क्षेत्रातही अनिल सरमळकर नेमके ‘दुखावलेत की पेटून उठलेत’ अशीच सध्या चर्चा सुरु झाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बहुतांश सामाजिक चळवळी आणि कलेमधील गट तट तसेच सर्वसमावेशक विचारांची उपेक्षा होत असल्याची केली टीका ; थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांचा बाजार होत असल्याची सरमळकरांची प्रसिद्धीपत्राद्वारे खंत.

'होमलेस इन माय लॅन्ड ' अशा उपेक्षेतही आपण करुणेची याचना करत नाही असे सरमळकरांचे प्रतिपादन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या सरमळे येथील नाट्यकर्मी,कवी, लेखक, दिग्दर्शक व सामाजिक चळवळीतले विचारक श्री अनिल सरमळकर हे 'आम आदमी' पक्षात जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे सूचीत केले आहे.

गेली २० वर्षे ते नाट्यचळवळीशी निगडीत आहेत. गेली ३ वर्षे फाॅक्स या नाट्य पुस्तकामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्यकर्मींच्या चर्चेचाही ते आवडता विषय बनलेत. युरोपातील काही विद्यापीठांतील बुद्धीमंतांनी त्यांना 'आंबेडकर इन आर्टस्' असे संबोधले आहे.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे नाटककार, कवी लेखक दिग्दर्शक आणि सामाजिक परिवर्तन चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते वक्ते अशी ओळख असणार्या डॉ. अनिल सरमळकर यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले की आजच्या घडीला सामाजिक व्यवस्था बदलाच्या प्रकीयेत 'आम आदमी पक्ष' सर्वात निष्पक्ष वस्तुनिष्ठ कार्य करत आहे आणि जिथे सारासार व वास्तवाला धरुन जगायची ताकद आहे तिथे आपण आपोआपच आकर्षीत होतो. सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने दिर्घ विचाराअंती आपण हा निर्णय घेऊनच राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नविन निर्णयानुसार ' आम आदमी पक्ष हाच एकमेव समाज सक्षम राजकीय पर्याय आपल्याला दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आजचा काळ हा लोकशाहीसाठी अत्यंत आव्हानात्मक असुन सामान्य जनतेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक भयंकर असे अराजक देशाला ग्रासत असताना समाज जिवनात राजकीय सत्तेच्या आधारे सामाजिक परिवर्तन आणणारा पक्ष म्हणुन मला आम आदमी पक्ष योग्य वाटतो त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि आदर्श नेते अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. त्यांच्यासारखेच लोकनेते आज देशासाठी दिलासा आहेत आणि आशा आहेत असे अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे.
मात्र अद्याप प्रवेश तारीख व तांत्रिक बाबी सुनिश्चित झाल्या नसून मात्र त्या दिशेने आपले विचार कधीच सुरु झाले होते व याबाबत विभागीय स्थानिक,राज्यस्तरीय तसेच काही राष्ट्रीय नेतृत्व आपल्या संपर्कात असून महत्वाची वैचारीक चर्चा दीर्घकाळ सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दलित चळवळ, इतर बहुतांश सामाजिक प्रकल्प उपक्रम व चळवळी , साहित्य , कला क्षेत्रातील गट तट आणि राजकीय दुकानदारी करणारे व सन्माननीय डाॅ. आंबेडकर व इतर थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांचा व्यवसाय करणारे भुरटे लोक यांना कंटाळून आपण कधीच कोणत्याही राजकीय पक्षात संघटनेत सहभागी झालो नव्हतो असे प्रसिद्धपत्रात नमूद करताना अनिल सरमळकर यांनी दलित समाजकारण राजकारण सांस्कृतिकतेत आलेली कुंठितवस्था आणि स्थितीशिलता आणि नेते आणि कार्यकर्त्यांचा पराकोटीचा स्वार्थ आणि संकुचित विचार यामुळेच दलित चळवळ उध्वस्त अवस्थेत आली आहे अशी त्यांची वैयक्तिक मताची व्यथा मांडली आहे. सजग आणि व्यापक विचार परिपेक्ष विचार मांडणार्या अनिल सरमळकर या तरूण लेखकाची उपेक्षा दलित साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रवाहातील संकुचित विकृत लोकांनी नेहमी केली व ती सुरुच आहे असा आरोप करत त्यांनी अनिल सरमळकर यांचे लेखन जागतिक स्तरावर पोहचल्यावरच ते प्रकाशात आले असा टोला लगावला आहे. आपण 'होमलेस इन माय लॅन्ड' अशा जाणीवेत जगत व सहन करत येऊनही स्वतःला कधीच करुणामय दृष्टीने पाहत नाही व तशी याचनाही करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्याला अभिप्रेत असणारे व्यापक विचार मांडण्यासाठी माझ्याकडे लेखणी आहे मात्र सामान्य लोकांसाठी काही प्रत्यक्ष कार्यही माझ्या हातुन व्हावे यासाठी माझा पिंड राजकीय नसूनही मी जास्तीत जास्त आदर्श देश हितकारक तत्वे असणाऱ्या ' आम आदमी पक्षाची आणि नेता म्हणुन आदरणीय अरविंदभाई केजरीवाल यांनाचा प्राथमिकता देइन असे संपर्क साधला असता अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे. हा निर्णय घ्यायचाच होता मात्र त्या आधी आपण ' द न्यू रिपब्लिक ऑफ इंडिया' ही संकल्पना मांडली असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्याच्या नव्या शक्यता आणि त्याचे पुनर्चिंतन करु पाहणारा समिक्षेचा 'रिरायटींग ऑफ आंबेडकर' हा महाप्रकल्प सुरु आहे. असहाय्य व गरजू जनतेसाठी थोडेफार ठोस व प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी एका जास्त व्यापक मंचाची आवश्यकता भासेल म्हणुनच आपण राजकीय दिशेने विचार करणे योग्य समजतो असेही डॉ. अनिल सरमळकर म्हणाले.

एक सर्जनशील लेखक व नाट्यकर्मी अचानक् राजकीय प्रवेशाचे संकेत देत थेट त्यांच्या पक्षाच्या निवडीबद्दल जाहीर भाष्य करुन गेल्याने जिल्ह्यातील अनेक चळवळी व राजकीय पक्षांमध्ये तसेच नाट्य व साहित्य क्षेत्रातही अनिल सरमळकर नेमके 'दुखावलेत की पेटून उठलेत' अशीच सध्या चर्चा सुरु झाली आहे.

error: Content is protected !!