उद्योग धंद्याला चालना देणारा आणि सर्व मध्यम वर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची दिली प्रतिक्रिया.
मालवण | सुयोग पंडित : अर्थसंकल्प मांडला जात असताना त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या राजकीय व उद्योग व्यवसाय तज्ञांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मालवणचे व्यापारी तसेच भाजपा उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी या अर्थसंकल्पाला ‘तुमचा आमचा” सामान्यांचा विचार करुन सादर झालेला अर्थसंकल्प असे अर्थसंकल्पाचे वर्णन केले आहे. विजय केनवडेकर हे भारत सरकारच्या एम.एस.एम.ई.अंतर्गत एस.सी | एस.टी. उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीचे सदस्य ही आहेत.
माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत विजय केनवडेकर यांनी नमूद केले की स्थानिक उद्योजकांना चालना देणारा व विक्री व्यवस्थेला प्रोत्साहन देणारा हा एक अभ्यासू अर्थसंकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक उत्पादन विक्री व्यवस्थेसाठी जिल्ह्या ठिकाणी एकत्र व विक्री व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे . MSME उद्योगांसाठी नवीन सुलभ कर्ज योजना आणण्यात आली आहे .
३ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करणाऱ्या MSME अंतर्गत उद्योजकांना करा मध्येही संपूर्ण सूट देण्यात आली आहे . ७५ लाख कमावणाऱ्या व्यावसायिकालाही व्यवसाय करात देण्यात आली आहे.
नवीन संकल्पना घेऊन उद्योग करणाऱ्या ‘स्टार्टअप उद्योगांना’ आयकरात १ वर्षाची पूर्ण सूट देण्यात आली आहे .
५ लाख कमाईला असणारा टॅक्स आता वाढवून ७ लाखापर्यंत केल्याने मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा मिळाला आहे.
आधी ही कर प्रणाली एकाच स्लॅब मध्ये होती त्यात बदल करून उत्पादनाच्या उलाढाली वर स्लॅप करून वेगवेगळे टॅक्स लावण्याचे प्रयोजन केले आहे .
यावरूनच दिसून येते की हा अर्थसंकल्प पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवूनच केलेला दिसतो.नवीन उद्योजकांना चालना देणारा व प्रोत्साहित करणारा हा अर्थसंकल्प आहे असे भाजपा व्यापार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि भारत सरकारच्या MSMEअंतर्गत SC/ST उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीचे सदस्य व मालवणचे व्यापारी विजय केनवडेकर यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा करत स्पष्ट केले आहे.