संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देेवगड तालुक्यातल्या केंद्र शाळा साळशी क्र. १ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र शाळा साळशी क्र. १ मधील साल २०१९ ते २०२१ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते सातवी मधील वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच गणित आणि इंग्लिश या विषयांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना,तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले. यामध्ये सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षातील मंदार साळसकर (पाचवी )सम्राट साळसकर (सहावी) रोहित महाजन (सातवी )या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमाकांंनी,तसेच गणित व इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील हिमानी घाडी (पाचवी ), मंदार साळसकर (सहावी), मधुरा नाईक (सातवी) या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने तसेच गणित विषयात प्रथम क्रमांकांंने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच श्वेता परब( पाचवी) मंदार साळसकर (सहावी) मधुरा नाईक (सातवी)यांंनी इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल या सर्वाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील वैभवी शंकरदास (पाचवी), हिमानी घाडी(सहावी), मंदार साळसकर (सातवी) यांनी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने व इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच देवश्री तेली(पाचवी ),रुपल साळसकर (सहावी) केतकी साळसकर( सातवी ) या गणित विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षीसे यशवंत आपा माळवदे याजकडून(आई लक्ष्मीबाई आपाशेठ माळवदे यांच्यास्मरणार्थ) , श्रीमती पदमावती पुरुषोत्तम पालयेकर यांजकडून (वडील आत्माराम व काका लक्ष्मण देवू साळसकर यांच्या स्मरणार्थ), तसेच बी एस गावकर या शिक्षण प्रेमीनी या शाळेला दिलेल्या कायमस्वरुपी ठेव रक्कमेेतून रोख बक्षीसे देण्यात आली. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा या स्पर्धा परीक्षेत जिल्हास्तरीय व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले तसेच रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश संपादन केले या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गांवकर, साळशी हायस्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, माजी सरपंच अनिल पोकळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर केंद्रप्रमुख वर्षा लाड यानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नूतन सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गांवकर, केंद्रप्रमुख वर्षा लाड, केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, सहाय्यक शिक्षिका हेमलता जाधव, स्मिता कोदले, संतोष मराठे या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी सरपंच वैशाली सुतार उपसरपंच कैलास गांवकर ग्रामपंचायत सदस्य विशाखा साळसकर ,आदिती रावले, पांडुरंग मिराशी, पूनम मणचेकर, प्रभाकर साळसकर, माजी सरपंच सुनील गांवकर , अनिल पोकळे, किशोर साळसकर, सत्यवान सावंत, माजी उपसरपंच राजेंद्र साटम , माजी ग्रा.प. सदस्य धााकू गावकर ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप गांवकर, किशोर लाड,सुजाता मिराशी,केंद्रप्रमुख वर्षा लाड केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम आदी उपस्थित होते.
गंगाधर कदम यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली व आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मराठे यांनी केले. रात्री मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर झाले त्यांना सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.