युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणी व प्रयत्नांना यश.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली बांधकरवाडीतील रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेलचा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांत नेटवर्कची पंचाईत झाली होती. याबाबत नगरसेवक व सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू करण्याकरिता एअरटेल कंपनीशी संपर्क साधला होता. परंतु टॉवर स्थलांतरित करायला काही कलावधी लागणार असल्याने या कालावधीत तात्काळ ट्रक टॉवर उभारणीची मागणी केली होती.
आज बांधकरवाडी दत्त मंदिर येथे हा ट्रक टॉवर उभारणीचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. यामुळे येत्या दोन दिवसात मोबाईल नेटवर्क सुरळीत होणार असून नेटवर्कची समस्या मार्गी लागणार आहे. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख उमेश वाळके उपस्थित होते.
मोबाईल धारकांची नेटवर्क अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता हा टाॅवर तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आल्याचेही श्री नाईक यांनी स्पष्ट केले आहे.