25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंगणेवाडीत संपन्न होणार भाजपचा आनंद सोहळा ; ‘पार्लमेंट टू पंचायत’ संकल्पना पूर्तीचाही विशेष आनंद असल्याची भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया.

- Advertisement -
- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची उपस्थिती.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा  जत्रोत्सव ४ फेब्रुवारीला होत आहे. या जत्रोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे उद्योग मंत्री नारायण राणे, तसेच आमदार आशिष शेलार , प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक नेते, मंत्री आंगणेवाडी येथे येत आहेत. जिल्ह्यातील  सुमारे ३०० पेक्षा जास्त ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच सध्या कार्यरत आहेत तसेच अनेक नगरपंचायत, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, अर्बन बँक यावर सुद्धा भाजपचीच  सत्ता आहे. पार्लमेंट टू पंचायत’ ही संकल्पना पूर्ण करण्यात आली आहे.

पुढील कालावधीत कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने एक आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक सोहळा असणार असून यावेळी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या जिल्ह्यात येत्या दोन वर्षात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी  जिल्ह्यात भरीव काम होण्याच्या दृष्टीने मंत्री महोदयांना मागणी करण्यात येणार आहे  असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी आंगणेवाडी येथे केले. या आनंद मेळाव्याची माहिती देण्यासाठी आंगणेवाडी – भोगलेवाडी तिठा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष  धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश बागवे, गणेश आंगणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  सदर आनंद मिळावा ४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर चार ते सात या वेळेत घेण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील जनतेने आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही  याची खबरदारी घेऊन  सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना,  उद्योग खासदार मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात होत आहे. पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने भाजपचे आभार व्यक्त करावे यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव देवीच्या साक्षीने करताना भाविकांना किंवा यात्रा परिसरात कोणाला त्रास होणार नाही यासाठी कार्यकर्ते काळजी घेणार आहेत.  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने आंगणेवाडी परिसरातील नऊ रस्ते पूर्ण होत आहेत. वीज वितरणची लाईन सुद्धा अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी जत्रा परिसरात असणार आहेत.  कुठलीही निवडणूक पुढे नसताना हा भाजपचा आनंद मेळावा होत आहे. यावेळी ५०० माणसे एकाच वेळी स्टेजवर असतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे.  सी-वर्ल्ड, नाणार प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या प्रकल्पाना चालना मिळणे आवश्यक आहे.अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावे यासाठी  मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आई भराडीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्यामुळे त्यांचे सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात भरून ठेवणारा असणार आहे. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले.

यावेळी विजय केनवडेकर, गणेश कुशे,  माजी सरपंच महेश मांजरेकर,  वेरली सरपंच धनंजय परब, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, निलेश खोत, संतोष लुडबे, माजी जी प सदस्य संतोष साटविलकर, संतोष पालव, भाई मांजरेकर, संतोष गांवकर, दत्ता वराडकर, विलास मेस्त्री, राजू परळेकर तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची उपस्थिती.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा  जत्रोत्सव ४ फेब्रुवारीला होत आहे. या जत्रोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे उद्योग मंत्री नारायण राणे, तसेच आमदार आशिष शेलार , प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक नेते, मंत्री आंगणेवाडी येथे येत आहेत. जिल्ह्यातील  सुमारे ३०० पेक्षा जास्त ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच सध्या कार्यरत आहेत तसेच अनेक नगरपंचायत, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, अर्बन बँक यावर सुद्धा भाजपचीच  सत्ता आहे. पार्लमेंट टू पंचायत' ही संकल्पना पूर्ण करण्यात आली आहे.

पुढील कालावधीत कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने एक आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक सोहळा असणार असून यावेळी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या जिल्ह्यात येत्या दोन वर्षात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी  जिल्ह्यात भरीव काम होण्याच्या दृष्टीने मंत्री महोदयांना मागणी करण्यात येणार आहे  असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी आंगणेवाडी येथे केले. या आनंद मेळाव्याची माहिती देण्यासाठी आंगणेवाडी - भोगलेवाडी तिठा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष  धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश बागवे, गणेश आंगणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  सदर आनंद मिळावा ४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर चार ते सात या वेळेत घेण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील जनतेने आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही  याची खबरदारी घेऊन  सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना,  उद्योग खासदार मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात होत आहे. पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने भाजपचे आभार व्यक्त करावे यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव देवीच्या साक्षीने करताना भाविकांना किंवा यात्रा परिसरात कोणाला त्रास होणार नाही यासाठी कार्यकर्ते काळजी घेणार आहेत.  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने आंगणेवाडी परिसरातील नऊ रस्ते पूर्ण होत आहेत. वीज वितरणची लाईन सुद्धा अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी जत्रा परिसरात असणार आहेत.  कुठलीही निवडणूक पुढे नसताना हा भाजपचा आनंद मेळावा होत आहे. यावेळी ५०० माणसे एकाच वेळी स्टेजवर असतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे.  सी-वर्ल्ड, नाणार प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या प्रकल्पाना चालना मिळणे आवश्यक आहे.अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावे यासाठी  मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आई भराडीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्यामुळे त्यांचे सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात भरून ठेवणारा असणार आहे. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले.

यावेळी विजय केनवडेकर, गणेश कुशे,  माजी सरपंच महेश मांजरेकर,  वेरली सरपंच धनंजय परब, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, निलेश खोत, संतोष लुडबे, माजी जी प सदस्य संतोष साटविलकर, संतोष पालव, भाई मांजरेकर, संतोष गांवकर, दत्ता वराडकर, विलास मेस्त्री, राजू परळेकर तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!