27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

आंगणेवाडीतून आनंदवार्ता ; आंगणेवाडीचा वार्षिक उत्सव २ दिवस साजरा होणार असल्याची अध्यक्ष भास्कर आंगणे यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

आंगणेवाडीतील श्री देवी भराडी जत्रेच्या पूर्व तयारीला वेग ; आंगणे कुटुंबीयांची सात्विक लगबग वाढली.

दुकाने थाटायला झाली सुरवात.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आस्थेचा शिरोमणी आणि दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा आता पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे.

यावर्षी हा जत्रोत्सव शनिवारी ४ फेब्रुवारीला साजरा होत आहे. यादिवशी पहाटे ३ वाजल्या पासून एकूण ९ दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय  आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटायला सुरवात केली असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.

गेली ३ वर्षे कोरोना साथ रोगामुळे जत्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र निर्बंध हटून मुक्त वातावरणात जत्रा होत असल्याने लाखो भाविकांची पाउले आंगणेवाडीत वळणार आहेत. आता जसजशी दुकाने सजायला लागली आहेत तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात.  यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक  होणार असल्याने  भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे. 

‘व्हीआयपी मार्ग’ अशी ओळख असलेला मसुरे आंगणेवाडी मार्गावरील दत्त घाटी मध्ये स्ट्रीट लाइट व्यवस्था प्रथमच करण्यात येत आहे. त्यामुळे सदर मार्ग अधिक सुरक्षित होणार आहे. देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी घेण्याच्या कामास प्रारंभ झाला असून यामुळे सदर परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे पोहोचणारे रस्ते दर्जा उन्नती करून  प्राधान्याने पूर्ण केल्याने भाविक आभार मानत आहेत. जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे. 

आंगणेवाडी जत्रेला मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. परंतु ४ फेब्रुवारी पूर्वी सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे. एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे. 

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव कोरोना महामारीच्या कारणास्तव गेली तीन वर्षे  मर्यादित  स्वरूपात साजरा केला गेला. त्यामुळे  गेली तीन वर्षे देवीचे अनेक भक्त या उत्सवात सहभागी होऊ शकले नाहीत. याच कारणास्तव श्री देवी भराडी मातेच्या आशिर्वादाने आंगणे कुटुंबीयांनी यात्रेकरूंसाठी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार्‍या उत्सवाचा कालावधी दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारी २०२३ पर्यत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे. हा उत्सव  ४ व ५ फेब्रुवारी असा दोन दिवस साजरा होणार आहे. जेणेकरून दुसऱ्या दिवशीही आंगणेवाडीत येणाऱ्या सर्वाना देवीचे दर्शन सुलभतेने घेता येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी भाविकांना कमी गर्दीमध्ये मातेचे दर्शन सुलभरीत्या होण्यास मदत होणार आहे. श्रीदेवी भराडी मातेच्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आंगणेवाडीतील श्री देवी भराडी जत्रेच्या पूर्व तयारीला वेग ; आंगणे कुटुंबीयांची सात्विक लगबग वाढली.

दुकाने थाटायला झाली सुरवात.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आस्थेचा शिरोमणी आणि दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा आता पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे.

यावर्षी हा जत्रोत्सव शनिवारी ४ फेब्रुवारीला साजरा होत आहे. यादिवशी पहाटे ३ वाजल्या पासून एकूण ९ दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय  आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटायला सुरवात केली असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.

गेली ३ वर्षे कोरोना साथ रोगामुळे जत्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र निर्बंध हटून मुक्त वातावरणात जत्रा होत असल्याने लाखो भाविकांची पाउले आंगणेवाडीत वळणार आहेत. आता जसजशी दुकाने सजायला लागली आहेत तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात.  यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक  होणार असल्याने  भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे. 

'व्हीआयपी मार्ग' अशी ओळख असलेला मसुरे आंगणेवाडी मार्गावरील दत्त घाटी मध्ये स्ट्रीट लाइट व्यवस्था प्रथमच करण्यात येत आहे. त्यामुळे सदर मार्ग अधिक सुरक्षित होणार आहे. देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी घेण्याच्या कामास प्रारंभ झाला असून यामुळे सदर परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे पोहोचणारे रस्ते दर्जा उन्नती करून  प्राधान्याने पूर्ण केल्याने भाविक आभार मानत आहेत. जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे. 

आंगणेवाडी जत्रेला मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. परंतु ४ फेब्रुवारी पूर्वी सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे. एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे. 

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव कोरोना महामारीच्या कारणास्तव गेली तीन वर्षे  मर्यादित  स्वरूपात साजरा केला गेला. त्यामुळे  गेली तीन वर्षे देवीचे अनेक भक्त या उत्सवात सहभागी होऊ शकले नाहीत. याच कारणास्तव श्री देवी भराडी मातेच्या आशिर्वादाने आंगणे कुटुंबीयांनी यात्रेकरूंसाठी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार्‍या उत्सवाचा कालावधी दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारी २०२३ पर्यत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे. हा उत्सव  ४ व ५ फेब्रुवारी असा दोन दिवस साजरा होणार आहे. जेणेकरून दुसऱ्या दिवशीही आंगणेवाडीत येणाऱ्या सर्वाना देवीचे दर्शन सुलभतेने घेता येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी भाविकांना कमी गर्दीमध्ये मातेचे दर्शन सुलभरीत्या होण्यास मदत होणार आहे. श्रीदेवी भराडी मातेच्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!