बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील सुप्रसिद्ध ‘नट वाचनालयात’ नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत यांच्या हस्ते नेताजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनंत भाटे यांनी नेताजी यांच्या देशभक्तीवर तसेच त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेबाबत विचार मांडले. नेताजी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबाबत सविस्तर विवेचन केले.
यावेळी वाचनालयाचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, अंकुश माजगांवकर, श्री. पेंडसे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू यांच्यासह वाचक उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.