मसुरे | प्रतिनिधी : सिंधदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ, मुंबई
पुरस्कृत स्व. जॉन पिंटो पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलन ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आचरा येथील जामडुल रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले आहे.
या पुरस्कार आचरे गांवचे सुपुत्र माजी जि.प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, चिंदर येथील श्री रुजाय फर्नांडिस यांना यापूर्वी जाहीर करण्यात आले आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे फादर माईकल जी (वसई) तर उदघाटक फादर फ्रान्सिस डिसोझा (चिंदर), मुख्य अतिथी रुजारिओ पिंटो, बाझील फर्नाडिस, सॅबी फर्नांडिस,
सरचिटणीस विल्यम फर्नांडिस, अध्यक्ष पास्कल लोबो उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला जास्तीतजास्त उपस्थितीचे आवाहन सिंधदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ, मुंबई यांनी केले आहे.