जीवनपट उलगडणाऱ्या चित्र प्रदर्शनाने स्व. बाळासाहेबांना आदरांजली.
संतोष साळसकर | सहसंपादक : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अखंड जीवन हे हिंदुत्वासाठी समर्पित होते. प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. शिवसेनेने प्रत्येक वेळी संघर्षातूनच यश मिळवलेले आहे. कठीण काळातही एकसंध राहण्याची शिकवण शिवसैनिकांनी आजही जोपासली आहे. हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी शिरगांव येथे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिरगांव येथील विभागीय कार्यालयात सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट व शिवसेना पक्षाच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणारे फोटो प्रदर्शन भरविण्यात आले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात कोरलेले आहेत. कसोटीच्या काळातील हेही दिवस निघून जातील. राजकारणापेक्षा विकासाबरोबर समाजकारणाची कास सर्वांनी जोमाने धरूया. शिवसैनिकांची एकजूट हीच खरी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली.असे शिवसेना देवगड उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमास तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल, विभागप्रमुख सुरेंद्र तावडे, शाखाप्रमुख महेश मेस्त्री, माजी उपसभापती अमित साळगांवकर, माजी शाखाप्रमुख हरी चव्हाण, सूर्यकांत तावडे, रघुनाथ साटम, शिरगाव-शेवरे राजेंद्र पोकळे, मनोज चव्हाण, ग्रामपंचायतीचे सरपंच समीर माजी विभागप्रमुख विक्रांत नाईक शिरगांवकर, ओंबळ सरपंच अरुण यांच्यासह विभागातील शिवसेनेचे पवार, माजी सरपंच संजय रुपये, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, बूथप्रमुख प्रथमेश तावडे, मंगेश शिंदे यांच्यासह विभागातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.