संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबईतील खार (पश्चिम) येथील रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेच्या १९८८ च्या दहावीच्या अ, ब आणि क तुकड्यांच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल ३५ वर्षांनंतर नुकतेच एकत्र आले .
या वेळी विद्यार्थी वर्गाने शिक्षकांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रतन वालावलकर माध्यमिक तंत्रशाळेतील १० वीत शिकणारे विद्यार्थी तब्बल ३५ वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी शाळा-कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या हृदय सोहळ्यास पांडे, कैसरे, पोतदार, जोशी या शिक्षिकांसह पटेल, उथळे, चौगुले, जागडे, राजपूत, जोशी, कुलकर्णी,
गरुड, मराठे, जगताप, तोडणकर व पांचाळ हे शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगी प्रार्थना, नृत्य, भजन, फिल्मी गाणी, छोट्या नाटिका, मूकनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन अजय सावंत, संजय कांबळी, रफिक कोंडकर, संतोष जाधव, संजय शेट्ये, कुंदन करगुटकर,
यशवंत पटार, योगेश मेहेर, सुषमा वाघचौडे, स्मिता म्हात्रे व संजय लाड आदींनी केले होते. मेहेंदळे सर, संतोष साळसकर, संजय वाघचौरे, यशवंत पटार, डेकोरेटर हरी काका, मंदिराचे विश्वस्त, संजय साऊंड व आरव्हीटी ग्रुप मित्र परिवार यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.