राणे विद्यामंदिर व दत्त विद्या मंदिर या शाळांमधील मुलांना केले खाऊचे वाटप.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे येथे हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नारिंग्रे येथे उत्साहात पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नारिंग्रे गावचे ग्रामस्थ, तसेच घाडीगांवकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार रघुवीर वायंगणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन करण्यात आले. तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्रीकांत गांवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे, शिवसेना शाखा क्रमांक ६० चे शाखाप्रमुख दीपक पवार, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अरुण कदम व सदस्या मृणाल गांवकर, माजी ग्रामपंचायत सदस्या विद्या बावकर, जयेश गांवकर, मंगेश घाडी, विलास शिंदे, राकेश कदम, विष्णू घाडी तसेच ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रसंगी नारिंग्रे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आबासाहेब राणे विद्यामंदिर व दत्त विद्या मंदिर या शाळांमधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.