25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा मंदिराला’ झाली वीज जोडणी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कार्यवाही.

- Advertisement -
- Advertisement -

वैभववाडी | नवलराज काळे : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या स्वप्नांची नगरी मुंबई हे बेटांचं शहर. त्यावर इंग्रजही पोचले परंतु महाराष्ट्राच्या पुणे व इतर भागात दळणवळण साठी अडकून पडले असताना या भागात असलेल्या मेंढपाळ बांधवांनी त्यांना रस्ता दाखवला. मुंबई-पुणे रस्ता जिथून आज लोकांची वहिवाट आहे. शिंग्रोबा धनगर यांनी केलेले ते कार्य केले परंतु त्यांना त्यासाठी बलिदान द्यावे लागले होते. या हुतात्म्याच्या मंदिर जवळील वीजेचे काम भारताच्या स्वातंत्र्या नंतरही ७५ वर्षे रखडले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीतून आणि भाजपा विमुक्त-भटके कार्यकर्त्यांच्या मागणी पुढाकारातून हे काम आता पूर्णत्वाला जात आहे. त्याबद्दल बहुजन वर्गाच्या वतीने राज्याचे लोकप्रिय श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले गेले आहेत. सामाजिक लढ्यास न्याय देऊन शिंग्रोबा मंदिर परिसर कायमचा उजळला आहे. बोरघाट (खोपोली), तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा’ प्रसिद्ध मंदिर आहे. धनगर समाज, विमुक्त-भटके समाजाचे व महराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. तेथे दरवर्षी १ मे रोजी मोठा भव्य उत्सव साजरा होतो. सदर मंदिरास विद्युत पुरवठा नसल्याने भेट देणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणत गैर सोय होत आहे. त्या अनुषंगाने १ KW वीज जोडणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व श्री. विश्वास पाठक, संचालक महावितरण यांना विमुक्त-भटके आघाडीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस श्री. संजय केनेकर व विमुक्त-भटके आघाडीचे प्रांताध्यक्ष श्री. नरेंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस संघटन श्री. अशोकजी चोरमले, सरचिटणीस श्री गोविंदा गुंजाळकर, कोकण विभागाचे सहसंयोजक श्री. भास्कर यमगर, कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री. उमेश पाटील,सौ. सुहासिनीताई केकाने, श्री. बबनराव बारगजे, सौ. विद्याताई तामखेड श्री. ईश्वर गोरे यांनी विनंती केली होती. त्या अनुषंगाने २१ जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आज जोडणी झाली.

महावितरण संचालक संचलन श्री. संजय ताकसांडे, महावितरण कार्यकारी अभियंता रायगड ग्रामीण श्री. शिवाजी वौयफालकर व उपअभियंता व महावितरणच्या कर्मचारी वृंदा यांचेही गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर,
प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र विमुक्त-भटके आघाडी यांनी याबद्दल आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वैभववाडी | नवलराज काळे : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या स्वप्नांची नगरी मुंबई हे बेटांचं शहर. त्यावर इंग्रजही पोचले परंतु महाराष्ट्राच्या पुणे व इतर भागात दळणवळण साठी अडकून पडले असताना या भागात असलेल्या मेंढपाळ बांधवांनी त्यांना रस्ता दाखवला. मुंबई-पुणे रस्ता जिथून आज लोकांची वहिवाट आहे. शिंग्रोबा धनगर यांनी केलेले ते कार्य केले परंतु त्यांना त्यासाठी बलिदान द्यावे लागले होते. या हुतात्म्याच्या मंदिर जवळील वीजेचे काम भारताच्या स्वातंत्र्या नंतरही ७५ वर्षे रखडले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीतून आणि भाजपा विमुक्त-भटके कार्यकर्त्यांच्या मागणी पुढाकारातून हे काम आता पूर्णत्वाला जात आहे. त्याबद्दल बहुजन वर्गाच्या वतीने राज्याचे लोकप्रिय श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले गेले आहेत. सामाजिक लढ्यास न्याय देऊन शिंग्रोबा मंदिर परिसर कायमचा उजळला आहे. बोरघाट (खोपोली), तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे 'वीर हुतात्मा शिंग्रोबा' प्रसिद्ध मंदिर आहे. धनगर समाज, विमुक्त-भटके समाजाचे व महराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. तेथे दरवर्षी १ मे रोजी मोठा भव्य उत्सव साजरा होतो. सदर मंदिरास विद्युत पुरवठा नसल्याने भेट देणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणत गैर सोय होत आहे. त्या अनुषंगाने १ KW वीज जोडणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व श्री. विश्वास पाठक, संचालक महावितरण यांना विमुक्त-भटके आघाडीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस श्री. संजय केनेकर व विमुक्त-भटके आघाडीचे प्रांताध्यक्ष श्री. नरेंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस संघटन श्री. अशोकजी चोरमले, सरचिटणीस श्री गोविंदा गुंजाळकर, कोकण विभागाचे सहसंयोजक श्री. भास्कर यमगर, कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री. उमेश पाटील,सौ. सुहासिनीताई केकाने, श्री. बबनराव बारगजे, सौ. विद्याताई तामखेड श्री. ईश्वर गोरे यांनी विनंती केली होती. त्या अनुषंगाने २१ जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आज जोडणी झाली.

महावितरण संचालक संचलन श्री. संजय ताकसांडे, महावितरण कार्यकारी अभियंता रायगड ग्रामीण श्री. शिवाजी वौयफालकर व उपअभियंता व महावितरणच्या कर्मचारी वृंदा यांचेही गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर,
प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र विमुक्त-भटके आघाडी यांनी याबद्दल आभार मानले आहेत.

error: Content is protected !!