26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन ; हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी काॅम्प्युटर एज्युकेशनचा उपक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

२३ जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन असून यानिमित्त दरवर्षी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा १ ली ते ४ थी, ५ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी प्रदीप पाटिल यांच्या दोन कविता निवडण्यात आलेल्या आहेत. मुलांनी पुन्हा एकदा लेखनाकडे गांभिर्याने पहावे, हस्स्ताक्षर सुधारावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

स्पर्धकांनी आपले साहित्य ‘ए 4’ मापाच्या कागदावर लिहून त्यामागे स्पर्धकाचे पूर्ण नांव, पत्ता, शाळेचे पूर्ण नांव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहून दि. ३० जानेवारीपर्यंत निकेत पावसकर, अक्षरोत्सव, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे किंवा श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, प्रज्ञांगण, महालक्ष्मी प्लाझा, खमंग हॉटेलजवळ, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवायचे आहे. 

या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मराठी भाषा पंधरवड्यात सुप्रसिध्द कवी प्रदीप पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांची निष्ठा ही कविता मागच्यावेळी  इ. ९ वी च्या अभ्यासक्रमात होती. ते १९९० नंतर काव्य लेखन करणारे महत्वाचे कवी असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

या तिनही गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल. तसेच, या स्पर्धेतील परिक्षकांच्या पसंतीनुसार निवडक कवितांच्या हस्तलिखिताचे प्रदर्शन बक्षिस वितरण कार्यक्रमाला करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या कवितांसाठी निकेत पावसकर ९४०३१२०१५६, श्रावणी मदभावे ७७१९८५८३८७ किंवा सतिश मदभावे ९४०५९२८८६५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

२३ जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन असून यानिमित्त दरवर्षी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा १ ली ते ४ थी, ५ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी प्रदीप पाटिल यांच्या दोन कविता निवडण्यात आलेल्या आहेत. मुलांनी पुन्हा एकदा लेखनाकडे गांभिर्याने पहावे, हस्स्ताक्षर सुधारावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

स्पर्धकांनी आपले साहित्य 'ए 4' मापाच्या कागदावर लिहून त्यामागे स्पर्धकाचे पूर्ण नांव, पत्ता, शाळेचे पूर्ण नांव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहून दि. ३० जानेवारीपर्यंत निकेत पावसकर, अक्षरोत्सव, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे किंवा श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, प्रज्ञांगण, महालक्ष्मी प्लाझा, खमंग हॉटेलजवळ, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवायचे आहे. 

या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मराठी भाषा पंधरवड्यात सुप्रसिध्द कवी प्रदीप पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांची निष्ठा ही कविता मागच्यावेळी  इ. ९ वी च्या अभ्यासक्रमात होती. ते १९९० नंतर काव्य लेखन करणारे महत्वाचे कवी असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

या तिनही गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल. तसेच, या स्पर्धेतील परिक्षकांच्या पसंतीनुसार निवडक कवितांच्या हस्तलिखिताचे प्रदर्शन बक्षिस वितरण कार्यक्रमाला करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या कवितांसाठी निकेत पावसकर ९४०३१२०१५६, श्रावणी मदभावे ७७१९८५८३८७ किंवा सतिश मदभावे ९४०५९२८८६५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

error: Content is protected !!