२ मुलींसह १२ वर्षाचा मुलाने देखील आईच्या उपचारासाठी केली आहे याचना.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे येथील मंगेश आणि नम्रता राणे हे पती पत्नी सध्या अत्यंत हालाखीच्या आर्थिक व शारिरीक स्थितीत आहेत. त्यांना दोन कन्या आणि एक मुलगा आहे.
५५ वर्षीय पती मंगेश हे पॅरलीसीसमुळे जायबंदी झालेले असतानाच त्यांच्या अवघ्या ३४ वर्षीय पत्नी नम्रता राणे या गर्भपिशवीच्या कॅन्सरचा सामना करत आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. सध्याची त्यांची घरची परिस्थिती संपूर्ण गरिबीची असल्यामुळे तीन लहान मुले असल्यामुळे उपचार घ्यायचे, संसाराचा रहाटगाडगा चालवायचा, की पोरांचे शिक्षण करायचे असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत .
त्यामुळे सामाजिक भावनेतून त्यांच्या मदतीसाठी समाजातील दानशूरांनी व सेवाभावी लोक अथवा संस्थांनी पुढे यावे अशी कळकळीची याचना राणे कुटुंबीयांनी केली आहे.
संबंधित राणे कुटुंब हे तळेरे – कासार्डे येथील शिक्षक कॉलनीत राहत आहेत. पती मंगेश राणे हे ५५ वर्षाचे असून त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे त्यांना चालता येत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा थांबला आहे. ही परिस्थिती असतानाच आता दुसरीकडे नम्रता यांना गर्भपिशवीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत त्या कणकवली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी आपल्याला मदत करावी, अशी कळकळीची विनवणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या आजारामुळे त्यांच्या समवेत असलेल्या निशा आणि तृप्ती या दोन मुली आणि बारा वर्षाचा विनायक हा मुलगा यांच्यासमोर शिक्षणाचा व पोषणाचा प्रश्न उभा राहिला आहे.
ज्या व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी या परिस्थितीची खातरजमा करुन बँक ऑफ महाराष्ट्र 60226556168, IFSC:- MAHB0001397 या बँक खात्यात आपली मोलाची रक्कम जमा करावी, तसेच अधिक माहितीसाठी त्यांच्याशी 86008 83038 या क्रमांकावर वर संपर्क साधावा असे सामाजिक आवाहन करण्यात आले आहे.
( मदत करु इच्छिणार्या दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी या संपूर्ण परिस्थितीची अधिक खातरजमा करुन मदत करावी. आपली सिंधुनगरी चॅनल समूह किंवा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या कोणत्याही प्रतिनिधीचा यांतील मदतीच्या आर्थिक व्यवहारात कोणताही संबंध नाही किंवा जबाबदारी नाही. हे एक सामाजीक आवाहन आहे. )