25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘बालभारती ते बालबाजार..’ जि. प. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीची अनोखी उपक्रम झेप…!

- Advertisement -
- Advertisement -

बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण ‘पोषक प्रकल्प..!’

विवेक परब | ब्यूरो चीफ :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. प्राथमिक शाळा, चिंदर सडेवाडी ही शाळा वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उपक्रम साजरी करत असते. त्यामधील एक उपक्रम म्हणजे शालेय मुलांचा बाल बाजार. काल २१ जानेवारीला हा बाल बाजार भरवला गेला.

आजच्या या बाजारात शाळेच्या परस बागेत मुलांनी पिकविलेल्या विविध भाज्या जसे लाल भाजी, मुळा भाजी, कोथिंबीर, अळू, वांगी, टोमॅटो, नवलकोल, नारळ, कणगे तसेच पोहे, कोबी वडे, गुलाबजाम, कोकणातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ अजून बरेच काही वस्तू, पदार्थ यांची दुकाने लागली होती.

या बाल बाजाराचा मुख्य उद्देश मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतील, बाजार ही संकल्पना समजेल, आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्याची जाहिरात कशी करावी याचा अनुभव यावा या उद्देशाने हा बाल बाजार उपक्रम घेण्यात आला. बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण ‘पोषक प्रकल्प असाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘बालभारती ते बालबाजार’असेही या प्रकल्पाचे वर्णन होऊ शकते. पुस्तकी ज्ञानाचा योग्य व थेट उपयोगाचा अनुभव आणि दोन्ही ज्ञानांतून निर्माण होणारी युवापिढी सक्षमीकरण असे एक वेगळे उद्दिष्ट या प्रकल्पात दिसून आले.

आजच्या या बाल बाजार प्रसंगी प्रसिध्द उद्योजक प्रकाश मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र हडकर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिवानी हडकर, विद्यमान अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे, उपाध्यक्ष किरण कांबळी, ग्रामस्थ सतीश हडकर तसेच अनेक ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. बाल बाजाराचे उद्घाटन सतीश हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंदर सडेवाडीतील ग्रामस्थांनी खरेदीसाठी भरगोस प्रतिसाद देऊन सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक यशवंत पाटील व आभार संभाजी पवार यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण 'पोषक प्रकल्प..!'

विवेक परब | ब्यूरो चीफ :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. प्राथमिक शाळा, चिंदर सडेवाडी ही शाळा वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उपक्रम साजरी करत असते. त्यामधील एक उपक्रम म्हणजे शालेय मुलांचा बाल बाजार. काल २१ जानेवारीला हा बाल बाजार भरवला गेला.

आजच्या या बाजारात शाळेच्या परस बागेत मुलांनी पिकविलेल्या विविध भाज्या जसे लाल भाजी, मुळा भाजी, कोथिंबीर, अळू, वांगी, टोमॅटो, नवलकोल, नारळ, कणगे तसेच पोहे, कोबी वडे, गुलाबजाम, कोकणातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ अजून बरेच काही वस्तू, पदार्थ यांची दुकाने लागली होती.

या बाल बाजाराचा मुख्य उद्देश मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतील, बाजार ही संकल्पना समजेल, आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्याची जाहिरात कशी करावी याचा अनुभव यावा या उद्देशाने हा बाल बाजार उपक्रम घेण्यात आला. बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण 'पोषक प्रकल्प असाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. 'बालभारती ते बालबाजार'असेही या प्रकल्पाचे वर्णन होऊ शकते. पुस्तकी ज्ञानाचा योग्य व थेट उपयोगाचा अनुभव आणि दोन्ही ज्ञानांतून निर्माण होणारी युवापिढी सक्षमीकरण असे एक वेगळे उद्दिष्ट या प्रकल्पात दिसून आले.

आजच्या या बाल बाजार प्रसंगी प्रसिध्द उद्योजक प्रकाश मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र हडकर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिवानी हडकर, विद्यमान अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे, उपाध्यक्ष किरण कांबळी, ग्रामस्थ सतीश हडकर तसेच अनेक ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. बाल बाजाराचे उद्घाटन सतीश हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंदर सडेवाडीतील ग्रामस्थांनी खरेदीसाठी भरगोस प्रतिसाद देऊन सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक यशवंत पाटील व आभार संभाजी पवार यांनी मानले.

error: Content is protected !!