28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कणकवलीत विद्युत दाहिनीवर मृतदेह दहनाला सुरुवात ;८० टक्के लाकडाची बचत होणार असल्याची नगराध्यक्ष समिर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : कोवीड काळात मृतदेह दहन करण्यासाठी लाकूड व मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन कणकवली नगरपंचायतीतर्फे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कणकवली शहरासाठी विद्युत दाहिनी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार कणकवलीसह जिल्हयातील सर्व न.पं.ना विद्युत दाहिन्या मंजूर झाल्या होत्या. कणकवली न.पं.ने काही महिन्यापूर्वी रितसर टेंडर काढून विद्युत दाहिनी कार्यान्वित केली होती. गुरुवारी रात्री या विद्युत दाहिनीवर पहिल्या मृतदेहाचे दहन करण्यात आले.

या दाहिनीमध्ये केवळ २० टक्केच लाकडे लागतात. ८० टक्के लाकडाची बचत होते, धूर फिल्टर होऊन हवेत जात असल्याने प्रदूषणही होत नाही. अवघ्या दोन तासात अस्थी उपलब्ध होतात. त्यामुळे कणकवलीकरांनी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या विद्युत दाहिनीचा वापर करावा, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले.

नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक अभि मुसळे उपस्थित होते. ते म्हणाले, मराठा मंडळनजीकच्या स्मशानभूमीत ही विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. गुरुवारी रात्री कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात एका वृध्दाचा मृत्यू झाला. या विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह दहन करण्याबाबत त्यांच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची तयारी दर्शवली आणि त्या मृतदेहाचे विद्युत दाहिनीत दहन करण्यात आले. विद्युत दाहिनीमध्ये दहन होणारा हा पहिलाच मृतदेह असल्याने त्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. ट्रॉलीत मृतदेह ठेवून तो विद्युत दाहिनीमध्ये सरकवला जातो. दीड ते दोन फूटाची २० टक्केच लाकडे लागतात. त्या लाकडांवरच मृतदेह जळतो. केवळ त्या अग्नीला हवा देण्याचे काम विद्युत दाहिनीची भट्टी करते. त्यामुळे एकसंघपणे अग्नी प्रज्वलीत होऊन मृतदेहाचे दहन होते आणि धूर फिल्टर होऊन हवेत जातो त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. अवघ्या दोन तासात राख आणि अस्थी गोळा करता येते. मृतदेहाची ज्यावेळी दहन प्रक्रिया सुरु होते त्यावेळी आवश्यक ते अंतिम विधीही विद्युत दाहिनी जवळून नातेवाईकांना करता येतात. शिवाय तीर्थक्षेत्रावर विसर्जन करण्यासाठी व अस्थी उपलब्ध होतात, राखही फार कमी असते. त्यामुळे कमी लाकडांमध्ये प्रदूषण विरहीत दहन प्रक्रिया या विद्युत दाहिनीमध्ये होणार आहे. जिल्हयात कणकवली न.पं.ने प्रथम विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह दहनास सुरुवात केली आहे. याबद्दल तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आणि विद्यमान पालकमंत्र्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह दहनाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने कोणाचा मृत्यू झाल्यास या विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहाचे दहन करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवलीकरांना केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!