सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे नूतन अध्यक्ष प्रकाश सावंत यांचे प्रतिपादन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ अध्यक्षपदी प्रकाश सावंत तर उपाध्यक्षपदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रकाश सावंत यांचे जि.प. माजी अध्यक्ष संदेश सावंत तर सुरेश ढवळ यांचे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी अभिनंदन केले.
शेतकरी संघ संचालक मंडळासाठी ७ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती विरूध्द उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात लढत झाली होती. यात सर्वच्या सर्व १५ जागा भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिळविल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त असल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संघाचे मावळते अध्यक्ष विठ्ठल देसाई, यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. संचालक किरण गावकर, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट, प्रशांत सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर, मिथिल सावंत, सदानंद हळदीवे, स्मिता पावसकर, विनिता बुचडे, गणेश तांबे, लीना परब तसेच संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे, आपल्यावर सुशील पारकर, फोंडाघाट माजी सरपंच संतोष आग्रे, वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, वरवडे माजी उपसरपंच आनंद घाडीगावकर, नगरसेविका कविता राणे, राजन परब आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगितले.
शेतकरी संघ अध्यक्षपदी निवड करून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिलेली जबाबदारी सार्थपणे पार पाडू. या निवडणुकीत संघाच्या सर्व सभासदांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल, असे काम आगामी काळात आम्ही करू, असे नूतन अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी सांगितले.