संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे हे वैशिष्ट्यपूर्ण गांव आहे. आज तळेरे सरपंचपदी स्वच्छ प्रतिमेचा माणूस विराजमान झाल्यानंतर अनेकांकडून आशा पल्लवीत होणे ही सहाजिकच बाब आहे. आपल्याकडे योग्य पाऊल व दिशा देण्याचे अंगी गुण असल्याने तळेरेचे नाव मोठे कराल असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. तळेरे येथे स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय व विविध मंडळाच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
नवनिर्वाचित सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे व सदस्यांचे ज्येष्ठ नागरिक दादा वरूणकर याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालय अध्यक्ष विनय पावसकर, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, सुनील बांदिवडेकर, सुप्रिया तळेकर, संदीप घाडी, रिया चव्हाण, सचिन पिसे, शरयू वायंगणकर, शशांक तळेकर, राजू जाधव यांच्यासह माजी सरपंच, उपसरंच, लोकप्रतिनीधी उपस्थित होते.
यावेळी तळेरेतील सर्व संघटना, मंडळे, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थांनीही नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे सत्कार केले. चंद्रकांत तळेकर, अरविंद महाडिक, राजू जठार, डी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शशांक तळेकर यांनी केले. आभार विनय पावसकर यांनी मानले.