संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार २२ जानेवारी रोजी सकाळी १० वा. माध्यमिक विद्यालय कनेडी येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा तीन गटात होईल. गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. गट १ ली ते ४ थी विषय माझे घर, बगिचा (गार्डन ) माझे गाव. यासाठी बक्षिसे प्रथम ७०० रु., द्वितीय ५०० रु., तृतीय ३०० रु., उत्तेजनार्थ २००रु. गट ५ वी ते ७ वी विषय गणेश जयंती,
वनभोजन, आवडता खेळ.. प्रथम १००० रु., द्वितीय ७०० रु. तृतीय ५००रु., उत्तेजनार्थ २००रु. गट ८ वी ते १० वी विषय -आवडता सण, कोरोना काळातील योद्धे, दशावतारातील नाटकातील कोणताही एक प्रसंग. प्रथम १५००रू., द्वितीय १०००रु., तृतीय ७००रु., उत्तजनार्थ ३००रु. व या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्षा, युवा संदेश प्रतिष्ठान तथा जि. प. माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत व जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे. नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी संदीप तांबे यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.