नेरूर येथील नवजीवन वाघोसेवाडी यांचे अभिनव आयोजन ; विस्मृतीत गेलेल्या खेळांना उर्जितावस्था देण्यासाठी अनोखे आयोजन.
कुडाळ । देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या जि.प.प्राथ.शाळा श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने
‘नवजीवन वाघोसेवाडी मित्र मंडळ आयोजित ‘खापरी चॕम्पियन चषक २०२३’ यशस्वी रीतीने संपन्न झाला. १६ जानेवारीला या चषकाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूर वाघोसेवाडी येथील जागृत ग्रामस्थ व एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून या ‘पारंपारिक खेळांना’ उर्जितावस्था देणारा हा उपक्रम उदयास आला व सर्व ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने तो साकार झाला.
या स्पर्धेचे उदघाटन भारतमातेच्या पूजनाने पार पडले यावेळी गावचे माननीय सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर ,गावचे उपसरपंच श्री.दत्ताराम म्हाडदळकर, ग्राम.पं.सदस्य प्रवीण नेरुरकर,ग्राम.पं.सदस्य मंजुनाथ फडके ,ग्राम.पं.सदस्य श्री.गोविंद कुडाळकर,
ग्राम.पं.सदस्या सौ.रोशनी नाईक,पंच माझा वेंगुर्ला गृपचे श्री.विश्वास पवार,श्री.अमृत काणेकर,नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश हळदणकर,विराज परब,डॉ.सोनाली परब,इतर शाळेचे शिक्षक , पालक ,अंगणवाडीची सेविका व मदतनीस,अंगणवाडी विद्यार्थी, पाच शाळेचे पहिली ते चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते.
मैदानाचे उदघाटन माननीय सरपंच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी जवळ वीस प्रकारच्या जुन्या खेळांचे आयोजन केलेले होते.उपस्थित मान्यवरानीही या खेळांचा आस्वाद घेतला .सांघिक खेळात यावेळी लगोरी या खेळाचा समावेश करण्यात आला.या खेळात नेरुर शाळा क्र.१ प्रथम व श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी द्वितीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत उत्तेजनार्थ अनुक्रमे चांदोस शाळा व वाघोसेवाडी शाळा,तृतीय क्रमांक शिरसोसवाडी शाळा,द्वितीय क्रमांक कांडरीवाडी शाळा आणि प्रथम चॕम्पियन चषकावर नाव नेरुर शाळा नंबर १ ने कोरले.
विजेत्यांना विविध बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्राम.पं.सदस्य.मंजुनाथ फडके ,ग्राम.पं.सदस्य श्री गोविंद कुडाळकर,श्री.प्रभाकर शृंगारे,सौ.माया शृंगारे,वाघोसेवाडी शाळेचे मुख्याधापक श्री.प्रसाद कुंटे,सहशिक्षिका सौ.पूर्वा गावडे,इतर शाळेचे शिक्षक गोसावी मॅडम, आरोसकर मॅडम, वरुटे सर, साळुंखे सर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण ठाकूर सर,अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि इतर पालक वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आभार मानण्यात आले.या स्पर्धेसाठी सर्व बक्षिसे ही श्री.प्रभात वालावलकर कुटुंबियांकडून देण्यात आली,सर्व चषके ही नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश हळदणकर यांनी दिली.
या स्पर्धेची प्रमाणपत्र ही अन्नपूर्णा भोजनालय नेरुर यांच्या सौजन्याने देण्यात आली.
यास्पर्धेत मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था श्री.कमलाकर नाईक(माजी नगरसेवक मुंबई)यांच्या कडून व जेवण श्री. राजा शृंगारे यांनी दिले. जेवणासाठी मदत श्री.रमेश गावडे व अमोल शृंगारे यांनी केले तर मुलांसाठी चॉकलेटस् श्री.उमाकांत तांबे यांनी दिली.या स्पर्धेसाठी विशेष मदत ही संतोष कुडाळकर यांनी केली. नवजीवन वाघोसेवाडीच्यावतीने सर्व सहकार्य करणा-या ग्रामस्थांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.