आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर लब्देवाडी येथे बिबट्याचा वावर वाढला असल्याने सध्या चिंदर ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत.
चिंदर माळरानावर लब्देवाडी परीसरालगत बरेच दिवस बिबट्याचा वावर दिसत आहे.पाळीव जनावरे तसेच गोठ्यातील शेळ्या ह्यांच्यावर हल्ला करण्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. तसेच काही वाटसरू व काही ग्रामस्थांना बिबट्या दिसून आल्याचेही सांगण्यात येत आहे.
बिबट्याचा वावर वाढल्याने परीसरात भितीचे वातावरण असुन बिबट्याला पकडून जंगल अधिवासात सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख समिर लब्दे आणि ग्रामपंचायत सदस्य पप्पू परूळेकर ग्रामस्थ ह्यांच्या कडुन वनविभागाकडे करण्यात आली आहे.
फोटो (गुगल संग्राहीत)