युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पोलिस निरिक्षकांना दिले निवेदन ; आंदोलनाचाही इशारा.
मालवण | सुयोग पंडित : आज सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांनी युवा सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कणकवली पोलिस निरिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेत एक निवेदन दिले.
सुशांत नाईक यांनी निवेदनात माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारायची धमकी दिली असा आरोप करत माजी खासदार डाॅ निलेश राणेंची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी युवा सेनेच्या माध्यमातून मागणी केली आहे.
माजी खासदार डाॅ. निलेश राणेंवर गुन्हा दाखल न झाल्यास युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी निवेदनातून दिला आहे.यावेळी सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर,अनुप वारंग, ॲड. हर्षद गावडे,तेजस राणे, गुरु पेडणेकर, आबू मेस्त्री, संदीप गावकर, निलेश परब,भाई साटम, इमाम नावलेकर,प्रतिक रासम, तात्या निकम, स्वप्नील शिंदे आदींसह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.