27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भिरवंडेची ‘कॅरम कन्या’ आता राष्ट्रीय स्पर्धेत ‘कॅरम क्वीन’ बनून करणार राज्याचे प्रतिनिधीत्व ! ( विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘कॅरमकन्या’ दिक्षा नंदकिशोर चव्हाणची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत बाजी.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या भिरवंडे गावासारख्या ग्रामीण भागातून येणारी आणि कनेडी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेली दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने नुकतेच चिपळूण डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

तिची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. पाचवीत असल्यापासून तिने कॅरम खेळातील कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. यापूर्वी तिने कॅरम स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. तिच्या वडिलांचे केश कर्तनालय असून तेही एक चांगले क्रिकेट खेळाडू तथा फलंदाज आहेत. आपल्या मुली विविध क्षेत्रात विशेषतः खेळात , संगीतक्षेत्रात निपुण व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

भिरवंडे सारख्या खेड्यात राहूनही कॅरम , क्रिकेट आणि संगीत यांचे कौशल्य संपादन करत स्वतःसह आपल्या मुलींनाही राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेत उतरवणाऱ्या नंदकिशोर चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने तिला ‘ नाभिक कॅरम कन्या ‘ म्हणून गौरविण्यात आले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि त्यांच्या टीमने दिक्षाचे अभिनंदन केले आहे.

दिक्षा आता ‘कॅरम क्वीन’ झाली आहे. तिच्या फलंदाज वडिलांच्या क्रिडा स्वप्नातील यशाचे चौकार व षटकार ती कॅरम बोर्डवरुन पूर्ण करुन दाखवेलच अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग जिल्ह्याची 'कॅरमकन्या' दिक्षा नंदकिशोर चव्हाणची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत बाजी.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या भिरवंडे गावासारख्या ग्रामीण भागातून येणारी आणि कनेडी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेली दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने नुकतेच चिपळूण डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

तिची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. पाचवीत असल्यापासून तिने कॅरम खेळातील कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. यापूर्वी तिने कॅरम स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. तिच्या वडिलांचे केश कर्तनालय असून तेही एक चांगले क्रिकेट खेळाडू तथा फलंदाज आहेत. आपल्या मुली विविध क्षेत्रात विशेषतः खेळात , संगीतक्षेत्रात निपुण व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

भिरवंडे सारख्या खेड्यात राहूनही कॅरम , क्रिकेट आणि संगीत यांचे कौशल्य संपादन करत स्वतःसह आपल्या मुलींनाही राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेत उतरवणाऱ्या नंदकिशोर चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने तिला ' नाभिक कॅरम कन्या ' म्हणून गौरविण्यात आले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि त्यांच्या टीमने दिक्षाचे अभिनंदन केले आहे.

दिक्षा आता 'कॅरम क्वीन' झाली आहे. तिच्या फलंदाज वडिलांच्या क्रिडा स्वप्नातील यशाचे चौकार व षटकार ती कॅरम बोर्डवरुन पूर्ण करुन दाखवेलच अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे.

error: Content is protected !!