मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील रहिवासी मंगला रंजन प्रभू (वय ७२ )यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे, दिर, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते रंजन प्रभू यांच्या त्या पत्नी तर कोकण मिरी लागवडीचे प्रणेते मिलिंद प्रभू यांची ती भावजय होत.
मंगला प्रभू यांच्या निधनामुळे बांदिवडे परिसरात शोक व्यक्त होत आहे.