23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मराठमोळे ऑलिंपिक पदकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना गुगलने केले ‘डूडल’ द्वारे अभिवादन…!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : आजपासून जवळपास ९० वर्षांपूर्वी सामान्य भारतीयांसाठी व विशेष करुन ग्रामीण भारतासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय कुस्ती तथा क्रीडा प्रशिक्षण सुविधा उपलब्ध नसताना सातारा येथे अस्सल मराठी मातीतल्या आखाड्यात कुस्तिगीर म्हणून कौशल्य कमावलेले आणि भारताचे पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव यांना काल १५ जानेवारीला त्यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने आपल्या सर्च पेजवर खाशाबा जाधव यांचे डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले.
गुगलने घेतलेल्या या दखलीमुळे आजच्या भारतीय युवकांना खाशाबा जाधव हे किती महान व्यक्तिमत्व होते हे समजले असेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कुस्तीपटूंकडून व कुस्तीच्या अस्सल शौकिनांकडून व्यक्त होत आहे.

भारताचे पहिले ऑलींपिकवीर म्हणुन ओळख असलेल्या खाशाबा जाधव यांनी जपानच्या हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकून ते वैयक्तिक प्रकारामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पदक विजेते खेळाडू ठरले. त्यापूर्वी १९०० साली भारता तर्फे खेळलेला ब्रिटीश अधिकारी नाॅर्मन प्रिचर्ड याने २ रौप्य पदके प्राप्त केली होती परंतु त्याला आजही ‘भारतीय पदक’ असे भारतवासी मानत नाहीत.

पैलवान खाशाबा जाधव यांना अभिवादन करताना डूडलमध्ये त्यांचे डिजीटल रेखाचित्र दाखवण्यात आले असून यामध्ये खाशाबा जाधव आपल्या प्रतिस्पर्ध्यावर चढाई करण्याच्या पवित्र्यात दाखवले गेले आहेत.

गुगलने आपल्या डूडलद्वारे वेबसाइटवर खाशाबा जाधव जाधव यांची सविस्तर माहिती देखील दिली आहे.कै.खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म १९२६ साली महाराष्ट्रातील गोळेश्वर गावात आजच्या दिवशी झाला होता. श्री जाधव यांना त्यांच्या वडिलांकडून कुस्ती खेळाचा वारसा मिळाला. ते गावातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक होते. खाशाबा जाधवांनी अवघ्या १० व्या वर्षी उत्कृष्ट जलतरणपटू आणि धावपटू म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी कुस्तीपटू होण्यासाठी वडिलांकडे प्रशिक्षणास सुरुवात केली.
खाशाबांची उंची ५ फूट ५ इंच होती परंतु त्यांच्यातील चपळतेमुळे ते त्यांच्या दशक्रोशितील सर्व शाळांमधील ते सर्वोत्तम कुस्तीपटू व ॲथलीट होते ही बाब अत्यंत उल्लेखनीय मानली जाते. भारत सरकारने २००० साली त्यांचा ‘मरणोत्तर’ अर्जुन पुरस्कार देत गौरव केला होता.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : आजपासून जवळपास ९० वर्षांपूर्वी सामान्य भारतीयांसाठी व विशेष करुन ग्रामीण भारतासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय कुस्ती तथा क्रीडा प्रशिक्षण सुविधा उपलब्ध नसताना सातारा येथे अस्सल मराठी मातीतल्या आखाड्यात कुस्तिगीर म्हणून कौशल्य कमावलेले आणि भारताचे पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव यांना काल १५ जानेवारीला त्यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने आपल्या सर्च पेजवर खाशाबा जाधव यांचे डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले.
गुगलने घेतलेल्या या दखलीमुळे आजच्या भारतीय युवकांना खाशाबा जाधव हे किती महान व्यक्तिमत्व होते हे समजले असेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कुस्तीपटूंकडून व कुस्तीच्या अस्सल शौकिनांकडून व्यक्त होत आहे.

भारताचे पहिले ऑलींपिकवीर म्हणुन ओळख असलेल्या खाशाबा जाधव यांनी जपानच्या हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकून ते वैयक्तिक प्रकारामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पदक विजेते खेळाडू ठरले. त्यापूर्वी १९०० साली भारता तर्फे खेळलेला ब्रिटीश अधिकारी नाॅर्मन प्रिचर्ड याने २ रौप्य पदके प्राप्त केली होती परंतु त्याला आजही 'भारतीय पदक' असे भारतवासी मानत नाहीत.

पैलवान खाशाबा जाधव यांना अभिवादन करताना डूडलमध्ये त्यांचे डिजीटल रेखाचित्र दाखवण्यात आले असून यामध्ये खाशाबा जाधव आपल्या प्रतिस्पर्ध्यावर चढाई करण्याच्या पवित्र्यात दाखवले गेले आहेत.

गुगलने आपल्या डूडलद्वारे वेबसाइटवर खाशाबा जाधव जाधव यांची सविस्तर माहिती देखील दिली आहे.कै.खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म १९२६ साली महाराष्ट्रातील गोळेश्वर गावात आजच्या दिवशी झाला होता. श्री जाधव यांना त्यांच्या वडिलांकडून कुस्ती खेळाचा वारसा मिळाला. ते गावातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक होते. खाशाबा जाधवांनी अवघ्या १० व्या वर्षी उत्कृष्ट जलतरणपटू आणि धावपटू म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी कुस्तीपटू होण्यासाठी वडिलांकडे प्रशिक्षणास सुरुवात केली.
खाशाबांची उंची ५ फूट ५ इंच होती परंतु त्यांच्यातील चपळतेमुळे ते त्यांच्या दशक्रोशितील सर्व शाळांमधील ते सर्वोत्तम कुस्तीपटू व ॲथलीट होते ही बाब अत्यंत उल्लेखनीय मानली जाते. भारत सरकारने २००० साली त्यांचा 'मरणोत्तर' अर्जुन पुरस्कार देत गौरव केला होता.

error: Content is protected !!