धडाडीचे सडेतोड युवा पत्रकारीता व्यक्तिमत्व मयुर ठाकूर उपाध्यक्षपदी..!
मालवण I सुयोग पंडित : गेली १५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारीतेतील धडाडीचे व सजग व्यक्तिमत्व व हळवल गावचे सुपुत्र उमेश परब यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे तर जिल्ह्यातील सध्याचे धडाडीचे सडेतोड युवा नांव मयूर ठाकुर यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली पंचायत समिती येथील पत्रकार कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यानंतर तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी उमेश परब व उपाध्यक्ष पदी आपला मयुर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पदी रोहन पारकर यांची नियुक्ती केली. तर खजिनदारपदी जेष्ठ पत्रकार आनंद तांबे यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी विराज गोसावी यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग उपाध्यक्ष समिल जळवी, सचिव शिरीष नाईक, खजिनदार संजना हळदिवे, सहखजिनदार संजय भाईप, सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर आदि सदस्य तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते.
श्री.उमेश परब यांनी आपली सिंधुनगरी चॅनलचे ब्युरोचीफ म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली होती. त्यानंतर ते आता राज्यस्तरावरील झी २४ तास साठी यशस्वी सेवा बजावत आहेत. या नियुक्ती बद्दल त्यांची आपली सिंधुनगरी चॅनल समूहातर्फेही अभिनंदन करण्यात येत आहे.