पुण्यातील प्रसिद्ध दिलिपराज प्रकाशनचा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे होते औचित्य…
पुणे | ब्यूरो न्यूज : गेली पन्नास वर्षे, पुण्यातील व संपूर्ण देशातील सुप्रसिद्ध असलेल्या दिलिपराज प्रकाशनचा सुवर्ण महोत्सवी सोहळा दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला गेला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्य व्यवस्थापक आणि सृजनशील कवयित्री सुगंधा सुहास शिरवळकर यांचा डाॅ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. दिलिपराज प्रकाशनच्या दमदार पन्नास वर्षांच्या वाटचालीत सुगंधा शिरवळकर यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या मंचावर दिलिपराज प्रकाशनचे संचालक सन्माननीय श्री.राजीव बर्वे, साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री. मिलिंद जोशी, सिम्बायोसिस कॉलेजचे संस्थापक व संचालक डॉ. शां. ब .मुजुमदार, डॉ. प्रकाश आमटे, प्रकाशनाच्या संचालिका मधुमिता राजीव बर्वे आणि सुगंधा शिरवळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
अभिनंदन मॅडम