24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

यु.पि.एस.सी. स्पर्धा परीक्षेची इंधना विनाची राॅकेटस्…ॲस्पायरंटस्…!

- Advertisement -
- Advertisement -

सिनेपट | वेबसिरीज विशेष : टि.व्हि.एफ.च्या वेबसिरीज या सर्वतोपरी वर्तमान काळातील युवापिढी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोड कटू अनुभवांवर अतिशय वास्तववादीपणे भाष्य करतात.
त्यातीलच २०२१ सालातील एक वेबसिरीज म्हणजे ‘ॲस्पायरंटस्’.

दिल्लीतील ‘ओल्ड राजेंद्रनगर’ हा भाग यु.पि.एस.सी. च्या ॲस्पायरंटस् म्हणजे इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींचे माहेर घर असतो.
युपिएससी किंवा स्पर्धा परीक्षांची संस्कृती नसानसात भिनलेले उत्तर भारतातील बहुतांश युवक ओल्ड राजेंद्रनगरात वावरत असतात. २०१२ साली अभिलाष,गुरी आणि एस.के. हे तीन ॲस्पायरंटस् असेच योगायोगाने एकत्र येतात. तिघांचीही कौटुंबिक स्थिती,वैचारीक घडण आणि बौद्धिक क्षमता भीन्न असून देखील तिघेही कायम एकत्र असतात. या तिघांनाही सगळे जण ‘ट्राय पाॅड’ नावाने ओळखत असतात.
युपिएससी परीक्षा उत्तीर्ण करुन प्रत्येकाला काहीतरी वेगळे करायचे असते. फरक इतकाच असतो की अभिलाष आणि एस.के. यांचे स्पर्धा परीक्षेचे शेवटचे प्रयत्न असतात तर गुरीचे अजून दोन अटेंप्ट म्हणजे प्रयत्न शिल्लक असतात. त्यामुळे गुरीची यु पि एस सी क्रॅक करायची ओढ किंवा ईर्षा अभिलाष आणि एस के एवढी नसते….तो बर्यापैकी तणावरहीत असतो.
अभिलाष स्वतः एक काॅर्पोरेट नोकरी सोडून युपिएससी साठी आलेला असतो त्यामुळे त्याचे परतीचे दोर कापले गेलेले असतात.

अशातच अभिलाषला संदीप भेटतो जो प्रचंड हुशार मार्गदर्शक पण तरिही युपिएससी परीक्षा उत्तीर्ण करु शकलेला नसतो.

स्पर्धा परीक्षांची गरज,नेमका अभ्यास आणि तो अभ्यास करता करता स्वतःच्या जीवनातील कुटुंब,मित्र आणि श्वास यांची घुसमट कशी होते ते थेट दर्शविणारी ही पाच भागांची वेबसिरीज…ॲस्पायरंटस्..!

जनतेचा सेवक व नोकर यांतील अस्पष्ट वैचारीक रेघ व्यवस्थित जपून दिग्दर्शकाने जमवून आणलेली ही ‘तप्त शैक्षणिक भट्टी’ आहे.
नविन कस्तुरीयाने रंगवलेला अभिलाष,शिवकांत परीहार या गुणी अभिनेत्याचा गुरी, अभिलाष थपियालचा एस.के ,सनी हिंदूजाचा संदीप आणि या सर्वात सरप्राईज पॅकेज म्हणून नमीत दुबेने साकारलेली धैर्या अशा प्रमुख पांच जणांवर आधारलेली ही वेबसिरीज.

धैर्या नेमकी कोण असते….अभिलाष,गुरी आणि एस.के. २०१८ साली पुन्हा भेटतात तेंव्हा काय होते आणि या सहा वर्षात स्काॅलर संदीपचे काय होते ते ॲस्पायरंटस् ही वेबसिरीज पाहून आपण जाणू शकता.
यु ट्यूब व एमॅझाॅन प्राईमवर याचे ४५ मिनिटांचे पाचही एपीसोडस उपलब्ध आहेत.

शिवकांत परिहारला अभिनय करताना पहाणे ही दरवेळी युवा वर्गासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आरशात पहाणे अशी पर्वणीच असते…!

दिपेश सुमित्रा जगदीश लिखीत व अपूर्व कार्की दिग्दर्शित ही वेबसिरीज स्पर्धा परीक्षांची आवड असणार्या प्रत्येक ॲस्पायरंटने व प्रत्येक शिक्षक पालकाने पहावी अशीच आहे. आजकाल स्पर्धा परीक्षांची जी जागृती होते आहे त्यातीलच एक प्रकल्प समजून ही वेबसिरीज अवश्य पहावी.

(आपली सिंधुनगरी चॅनल | सिनेपट )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिनेपट | वेबसिरीज विशेष : टि.व्हि.एफ.च्या वेबसिरीज या सर्वतोपरी वर्तमान काळातील युवापिढी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोड कटू अनुभवांवर अतिशय वास्तववादीपणे भाष्य करतात.
त्यातीलच २०२१ सालातील एक वेबसिरीज म्हणजे 'ॲस्पायरंटस्'.

दिल्लीतील 'ओल्ड राजेंद्रनगर' हा भाग यु.पि.एस.सी. च्या ॲस्पायरंटस् म्हणजे इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींचे माहेर घर असतो.
युपिएससी किंवा स्पर्धा परीक्षांची संस्कृती नसानसात भिनलेले उत्तर भारतातील बहुतांश युवक ओल्ड राजेंद्रनगरात वावरत असतात. २०१२ साली अभिलाष,गुरी आणि एस.के. हे तीन ॲस्पायरंटस् असेच योगायोगाने एकत्र येतात. तिघांचीही कौटुंबिक स्थिती,वैचारीक घडण आणि बौद्धिक क्षमता भीन्न असून देखील तिघेही कायम एकत्र असतात. या तिघांनाही सगळे जण 'ट्राय पाॅड' नावाने ओळखत असतात.
युपिएससी परीक्षा उत्तीर्ण करुन प्रत्येकाला काहीतरी वेगळे करायचे असते. फरक इतकाच असतो की अभिलाष आणि एस.के. यांचे स्पर्धा परीक्षेचे शेवटचे प्रयत्न असतात तर गुरीचे अजून दोन अटेंप्ट म्हणजे प्रयत्न शिल्लक असतात. त्यामुळे गुरीची यु पि एस सी क्रॅक करायची ओढ किंवा ईर्षा अभिलाष आणि एस के एवढी नसते….तो बर्यापैकी तणावरहीत असतो.
अभिलाष स्वतः एक काॅर्पोरेट नोकरी सोडून युपिएससी साठी आलेला असतो त्यामुळे त्याचे परतीचे दोर कापले गेलेले असतात.

अशातच अभिलाषला संदीप भेटतो जो प्रचंड हुशार मार्गदर्शक पण तरिही युपिएससी परीक्षा उत्तीर्ण करु शकलेला नसतो.

स्पर्धा परीक्षांची गरज,नेमका अभ्यास आणि तो अभ्यास करता करता स्वतःच्या जीवनातील कुटुंब,मित्र आणि श्वास यांची घुसमट कशी होते ते थेट दर्शविणारी ही पाच भागांची वेबसिरीज…ॲस्पायरंटस्..!

जनतेचा सेवक व नोकर यांतील अस्पष्ट वैचारीक रेघ व्यवस्थित जपून दिग्दर्शकाने जमवून आणलेली ही 'तप्त शैक्षणिक भट्टी' आहे.
नविन कस्तुरीयाने रंगवलेला अभिलाष,शिवकांत परीहार या गुणी अभिनेत्याचा गुरी, अभिलाष थपियालचा एस.के ,सनी हिंदूजाचा संदीप आणि या सर्वात सरप्राईज पॅकेज म्हणून नमीत दुबेने साकारलेली धैर्या अशा प्रमुख पांच जणांवर आधारलेली ही वेबसिरीज.

धैर्या नेमकी कोण असते….अभिलाष,गुरी आणि एस.के. २०१८ साली पुन्हा भेटतात तेंव्हा काय होते आणि या सहा वर्षात स्काॅलर संदीपचे काय होते ते ॲस्पायरंटस् ही वेबसिरीज पाहून आपण जाणू शकता.
यु ट्यूब व एमॅझाॅन प्राईमवर याचे ४५ मिनिटांचे पाचही एपीसोडस उपलब्ध आहेत.

शिवकांत परिहारला अभिनय करताना पहाणे ही दरवेळी युवा वर्गासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आरशात पहाणे अशी पर्वणीच असते…!

दिपेश सुमित्रा जगदीश लिखीत व अपूर्व कार्की दिग्दर्शित ही वेबसिरीज स्पर्धा परीक्षांची आवड असणार्या प्रत्येक ॲस्पायरंटने व प्रत्येक शिक्षक पालकाने पहावी अशीच आहे. आजकाल स्पर्धा परीक्षांची जी जागृती होते आहे त्यातीलच एक प्रकल्प समजून ही वेबसिरीज अवश्य पहावी.

(आपली सिंधुनगरी चॅनल | सिनेपट )

error: Content is protected !!