विवेक परब/ ब्यूरो चिफ — सांगली कवठे महंकाळ येथे पार पडलेल्या १७ व १९ वर्षा खालील मुले – मुली विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील विजयी संघ सहभागी झाले होते. यामध्ये १७ वर्षोखालील मुलांच्या गटात सिंधुदुर्गचे नेतृत्व जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. सांगली संघाबरोबर अंतिम सामना अटीतटीचा होऊन त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या संघात कौस्तुभ सकपाळ(कर्णधार), शुभम लब्दे, सोहम चिंदरकर, हर्षद मेस्त्री, शुभम गावडे व हर्ष घाडीगावकर हे खेळाडू सहभागी झाले होते. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष अण्णा ( सुरेंद्र) सकपाळ, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. संस्थाध्यक्ष सुरेद्र(अण्णा) सकपाळ व त्रिंबक पोलिस पाटील सीताराम सकपाळ यांची सांगली येथे संघ नेण्यासाठी मोलाची मदत केली.