23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधुदुर्ग पुत्र संगीतकार ‘कुणाल भगत यांना ‘सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता’चा पुरस्कार ..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : अनेक लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी  कुणाल भगत आणि करण सावंत यांनी संगीतबध्द केलेल्या ‘योगयोगेश्वर जयशंकर’ मालिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘बीग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. या जोडीमधिल कुणाल भगत हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील माणगांवचे सुपुत्र तर करण सावंत हे महाड येथील आहेत.

या जोड गोळीने आत्तापर्यंत महामिनिस्टर, किचन कल्लाकार, बस बाई बस, नवा गडी नवं राज्य, बॅंड बाजा बारात, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ? अश्या तब्बल १४ मालिकांच्या ‘शीर्षक गीतांना’ संगीतबद्ध केलेले आहे.

संगीतकार कुणाल – करण त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी म्हनाले की, “आजपर्यंत आम्ही १४ मालिकेचं शीर्षक गीत केले आहे आणि त्यात योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेला पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद होत आहे. कारण हे शीर्षक गीत इतकं लोकप्रिय आहे की लोकांच्या प्रतिक्रिया नेहमी येत असतात की हे गाणं खूप मनाला भावणार आहे, रोज आम्ही ऐकतो, भक्तीत तल्लीन करणार आहे, लोकांच्या ह्या प्रेमामुळेच आज ह्या शीर्षक गीताला सगळ्यात जास्त वोट्स मिळून ‘बिग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार मिळाला. ही पोच पावती आमच्यासाठी संगीतकार, गीतकार म्हणून खूप मोलाची आहे.” 

पुढे ते सांगतात, “खर तर हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही हे गाणं आपलंसं करून घेणं आणि त्यावर इतकं प्रेम करण ह्या पेक्षा जास्त काय महत्वाचं असेल एका कलाकाराला. कर्लस मराठी, झंकार फिल्मस्, निर्माते संजय शंकर, सहनिर्माते चिन्मय उदगीरकर, गायक रविंद्र खोमणे आणि गायिका सोनाली सोनावणे यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, तसेच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार, कुणाल – करण वर असच प्रेम असुद्या, आणि आम्ही अशीच  नवनवीन गाणी  तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू.”

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : अनेक लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी  कुणाल भगत आणि करण सावंत यांनी संगीतबध्द केलेल्या 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. या जोडीमधिल कुणाल भगत हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील माणगांवचे सुपुत्र तर करण सावंत हे महाड येथील आहेत.

या जोड गोळीने आत्तापर्यंत महामिनिस्टर, किचन कल्लाकार, बस बाई बस, नवा गडी नवं राज्य, बॅंड बाजा बारात, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ? अश्या तब्बल १४ मालिकांच्या 'शीर्षक गीतांना' संगीतबद्ध केलेले आहे.

संगीतकार कुणाल - करण त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी म्हनाले की, “आजपर्यंत आम्ही १४ मालिकेचं शीर्षक गीत केले आहे आणि त्यात योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेला पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद होत आहे. कारण हे शीर्षक गीत इतकं लोकप्रिय आहे की लोकांच्या प्रतिक्रिया नेहमी येत असतात की हे गाणं खूप मनाला भावणार आहे, रोज आम्ही ऐकतो, भक्तीत तल्लीन करणार आहे, लोकांच्या ह्या प्रेमामुळेच आज ह्या शीर्षक गीताला सगळ्यात जास्त वोट्स मिळून ‘बिग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार मिळाला. ही पोच पावती आमच्यासाठी संगीतकार, गीतकार म्हणून खूप मोलाची आहे.” 

पुढे ते सांगतात, “खर तर हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही हे गाणं आपलंसं करून घेणं आणि त्यावर इतकं प्रेम करण ह्या पेक्षा जास्त काय महत्वाचं असेल एका कलाकाराला. कर्लस मराठी, झंकार फिल्मस्, निर्माते संजय शंकर, सहनिर्माते चिन्मय उदगीरकर, गायक रविंद्र खोमणे आणि गायिका सोनाली सोनावणे यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, तसेच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार, कुणाल - करण वर असच प्रेम असुद्या, आणि आम्ही अशीच  नवनवीन गाणी  तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू.”

error: Content is protected !!