23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पोखरण शाळा क्र. १ च्या शतक महोत्सवी वर्षाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात येत असून शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळात शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्व जाणून घेऊन १९२४ साली पोखरण शाळेची स्थापना झाली.हि गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. शेतकरी, गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेची इमारत बांधली असून आज हीच शाळा दिमाखात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेऊन आज मोठ मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत.विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेत सर्व सोयी सुविधा असणे गरजेचे आहे.गुणवत्ता वाढवणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शाळेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, पोखरण कुसबे सरपंच समीक्षा जाधव,रोटरी क्लब प्रेसिडेंट वर्षा बांदेकर,केंद्रप्रमुख संजय कदम, मुख्याध्यापिका प्रतीक्षा कदम, विश्वनाथ सावंत, अरुण सावंत,सविता सावंत, पंढरीनाथ सावंत, विठोबा सावंत,रवींद्र पांगम, संतोष सावंत,दिया मठकर,सुभाष सावंत, एस. वाय. सावंत, दीपक सावंत आदी शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात येत असून शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळात शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्व जाणून घेऊन १९२४ साली पोखरण शाळेची स्थापना झाली.हि गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. शेतकरी, गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेची इमारत बांधली असून आज हीच शाळा दिमाखात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेऊन आज मोठ मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत.विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेत सर्व सोयी सुविधा असणे गरजेचे आहे.गुणवत्ता वाढवणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शाळेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, पोखरण कुसबे सरपंच समीक्षा जाधव,रोटरी क्लब प्रेसिडेंट वर्षा बांदेकर,केंद्रप्रमुख संजय कदम, मुख्याध्यापिका प्रतीक्षा कदम, विश्वनाथ सावंत, अरुण सावंत,सविता सावंत, पंढरीनाथ सावंत, विठोबा सावंत,रवींद्र पांगम, संतोष सावंत,दिया मठकर,सुभाष सावंत, एस. वाय. सावंत, दीपक सावंत आदी शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत यांनी केले.

error: Content is protected !!