८ जानेवारी पर्यंत चालणार महोत्सव .
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चारकोप, सेक्टर ३ येथील ओमकारेश्वर मैदानात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका संध्या दोशींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चारकोप गोराई परिसरातील कोकणवासीयांना नववर्षाची ही सांस्कृतिक आणि सामाजिक भेट असल्याचे अध्यक्ष भरत नाईक, सचिव प्रकाश परब आणि खजिनदार
दिनेश सावंत यांनी सांगितले. चारकोप गोराई म्हाडा वसाहतीत कोकणातील समाज मोठ्या प्रमाणात आहे. १९९२ मध्ये कौटुंबिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाची स्थापना करण्यात आली मंडळाच्या
माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात. दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागताला कलाकारांना, व्यावसायिकांना चालना मिळावी, तरुणांमध्ये दशावतारी नाटकांची आनंद निर्माण व्हावी कोकण आले आहे.
संस्कृती वाढीस लागावी, या हेतूने दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन १ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. गोपुत्र गोकर्ण, गजकर्ण गजासुर, गजाली भूताच्या, भीमाची पायरी, श्रीयाळ चांगुणा, दिव्य तेजधारी भार्गव, पुष्प हद्दपार आणि महिलांची डबल बारी अशी सुप्रसिद्ध नाटके यावेळी सादर केली जाणार आहेत.
कोकणवासीयांसह नाट्य रसिकांनी नववर्षाच्या सुरुवातीला मनसोक्त आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.