24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चंद्रकांत विजय गोलतकर : सरपंच ते समाज समन्वयक.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | संपादकीय विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच संपन्न होऊन त्यांचे निकाल लागले. काही ग्रामपंचायत क्षेत्रात राजकीय मंथनं होऊन ग्रामपंचायत सदस्य बदलले तर काही ठिकाणी नवीन सरपंचांनी त्यांची कारकिर्द सुरु केली.
काही ग्रामपंचायत क्षेत्रातून ‘बिनविरोध’ हा गावासाठी एक थोडासा व्यापक वैचारिक विचारसुद्धा रुजला गेला.
याच विचारतील मालवण तालुक्यातील एक गांव म्हणजे पळसंब गांवातील ग्रामपंचायतीने स्वतःचा ठसा उमटवला.
याच पळसंब गांवचे मावळते सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या कार्यकालातील म्हणजे मागील पांच वर्षातील काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या.

२०१७ साल आले आणि ते वर्ष माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या आयुष्यात काही अनपेक्षित अशा अनेक गोष्टी घेऊन आल्या. ग्रामपंचायत निवडणूक लागल्या आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी निवडणूक लढवली
निकाल पाहता गावातील मतदार वर्गाने चंद्रकांत गोलतकर यांच्या पक्षाच्या पारड्यात मतदान करुन त्यांना बहुमत दिले आणि चंद्रकांत गोलतकर यांच्या भाळीच्या राजयोगाने ते गांवचे प्रथम नागरीक बनले.

सरपंच पद स्वीकारल्या नंतर मनात त्यांनी एकच स्वप्न पाहिले ते म्हणजे पळसंब गांवचा सर्वांगीण विकास आणि गावातील प्रत्येकाची सुशासीत प्रगती.
सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासन यांची पूर्ण माहिती घ्यायला थोडा अवधी जरुर गेला परंतु नंतर पूर्ण वेळ ग्रामपंचायतीला वाहून दिल्यामुळे व ग्रामपंचायत हे आपले दुसरे घर मानल्याने तेथील कर्मचारी तसेच सहकारी हे एक कुटुंबीय झाले. याच्या समन्वयातून गावच्या प्रगतीला योग्य अशी निश्चित दिशा मिळाली.

गावातील मुलांची शैक्षणिक बाजू भक्कम व्हावी व मुलांनी प्रगती करावी म्हणून ते सदैव कार्यतत्पर होते. यासाठी वेळोवेळी शिक्षक, शिक्षण तज्ञ, मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन घेतले. शाळा डिजिटल, पट संख्खे अभावी शिक्षक वृंदही कमी करण्यात आले परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी सहकार्यांनह अथक गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी यांचा त्यांनी पाठ-पुरावा केला व शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. अंगणवाडी मुलांसाठी पोषण आहार, सुदृढ बालक स्पर्धा या सारखे उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला. त्यात गावातील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पळसंब गांव सुजलाम् सुफलाम् व्हाव बळीराजा सुखी व्हावा यासाठी भगीरथ प्रतिष्ठान सारख्या संस्थेचे योगदान मिळाले, यामध्ये शेतीस पूरक असे म्हणजेच लागवडीसाठी बि-बियाणे, कुक्कुट पालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय यासारख्या विविध शेती विषयक योजना या सारखे बळीराजाचे हित लक्षात घेऊन उपक्रम राबविण्यात यश मिळाले.

गावातील लोकांच्या आरोग्याची बाब लक्षात घेता गर्भवती महिलांन पासून वयोवृद्धान पर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत व्यक्तीशः प्रयत्न केला. अनेक संस्था संघटना यांनाच्या सहकार्याने आरोग्याच्या दृष्टीने विविध आरोग्य शिबिरे भरविण्यात आली.

कोरोना तथा कोविड १९ काळात जगावर संकट असताना पळसंब गावावर सुद्धा करोनाचा विळखा एवढा घट्ट होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. तरी देखील आरोग्य यंत्रणा तसेच गावातील ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गांव त्यातून बाहेर पडला.

आपल्या गावासाठी विविध सरकारी योजना राबवता येतील तेवढ्या राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी वेळप्रसंगी थेट शासन दरबारी पाठपुरावा चंद्रकांत गोलतकर यांनी स्वतः सरपंच म्हणून केला.

गावच्या देवस्थान कार्यात देखील त्यांनी तेवढ्याच जोमाने सात्त्विकतेने, आध्यात्मिकतेने सहभाग घेतला. देवस्थान ट्रस्टसाठी सर्वांच्या साथीने प्रयत्न करुन तो यशस्वी केला.
दलित वस्ती विकास निधी मिळवून त्या वस्तीची कामे सुद्धा पूर्णत्वास नेण्याचे कार्य सुद्धा माझ्या हातून पार पडले आणि या बौद्धवाडीचा तेही एक महत्वाचे पण एक घटक बनले.
संपूर्ण गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करून आणली. त्यासाठी प्रसंगी पक्षीय राजकारणही बाजूला ठेवले. गावात कोणत्याही कंपनीच नेटवर्कचा नव्हत या डिजिटल युगात गैरसोय होती त्यासाठी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्यामुळे गावात नेटवर्क आले.

सरपंच पदाच्या काळात मला पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते अनेक पक्षाचे नेते, विविध संघटना यांनी बहुमोल अशी साथ दिली असे चंद्रकांत गोलतकर आवर्जून सांगतात.

आपल्या सरपंच कार्यकालाचा आढावा घेताना स्वतः चंद्रकांत विजय गोलतकर हे जितके समाधानी आहेत तितकेच यापुढेही त्यांना आपला गांव व परिसरात ठोस असे काम करत रहायचे आहे हे ते विशेष नमूद करतात.
सरपंच पदाच्या शेवटच्या ३ महिन्यात त्यांची सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुक्याध्यक्षपदी निवड झाली ही त्यांच्या कार्याची घेतली गेलेली एक सर्वोच्च दखलच आहे. सरपंचपद हे ‘समाज समन्वयाचे’ वरदान असल्याचे चंद्रकांत गोलतकर यांनी नेहमीच कृतीने दाखवले आहे.

ग्रामदेवता आई देवी जयंती व श्री देव रवळनाथ यांचे ॠण मनाशी घट्ट ठेवून आपल्या शेतीच्या गावाला सतत आघाडीवर ठेवण्यासाठी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर नेहमीच प्रयत्नशील रहाणार आहेत. विज्ञान,तंत्रज्ञान व सोबतच अध्यात्मिक सज्ञान जपलेल्या चंद्रकांत गोलतकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

सुयोग पंडित (मुख्य संपादक)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | संपादकीय विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच संपन्न होऊन त्यांचे निकाल लागले. काही ग्रामपंचायत क्षेत्रात राजकीय मंथनं होऊन ग्रामपंचायत सदस्य बदलले तर काही ठिकाणी नवीन सरपंचांनी त्यांची कारकिर्द सुरु केली.
काही ग्रामपंचायत क्षेत्रातून 'बिनविरोध' हा गावासाठी एक थोडासा व्यापक वैचारिक विचारसुद्धा रुजला गेला.
याच विचारतील मालवण तालुक्यातील एक गांव म्हणजे पळसंब गांवातील ग्रामपंचायतीने स्वतःचा ठसा उमटवला.
याच पळसंब गांवचे मावळते सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या कार्यकालातील म्हणजे मागील पांच वर्षातील काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या.

२०१७ साल आले आणि ते वर्ष माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या आयुष्यात काही अनपेक्षित अशा अनेक गोष्टी घेऊन आल्या. ग्रामपंचायत निवडणूक लागल्या आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी निवडणूक लढवली
निकाल पाहता गावातील मतदार वर्गाने चंद्रकांत गोलतकर यांच्या पक्षाच्या पारड्यात मतदान करुन त्यांना बहुमत दिले आणि चंद्रकांत गोलतकर यांच्या भाळीच्या राजयोगाने ते गांवचे प्रथम नागरीक बनले.

सरपंच पद स्वीकारल्या नंतर मनात त्यांनी एकच स्वप्न पाहिले ते म्हणजे पळसंब गांवचा सर्वांगीण विकास आणि गावातील प्रत्येकाची सुशासीत प्रगती.
सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासन यांची पूर्ण माहिती घ्यायला थोडा अवधी जरुर गेला परंतु नंतर पूर्ण वेळ ग्रामपंचायतीला वाहून दिल्यामुळे व ग्रामपंचायत हे आपले दुसरे घर मानल्याने तेथील कर्मचारी तसेच सहकारी हे एक कुटुंबीय झाले. याच्या समन्वयातून गावच्या प्रगतीला योग्य अशी निश्चित दिशा मिळाली.

गावातील मुलांची शैक्षणिक बाजू भक्कम व्हावी व मुलांनी प्रगती करावी म्हणून ते सदैव कार्यतत्पर होते. यासाठी वेळोवेळी शिक्षक, शिक्षण तज्ञ, मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन घेतले. शाळा डिजिटल, पट संख्खे अभावी शिक्षक वृंदही कमी करण्यात आले परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी सहकार्यांनह अथक गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी यांचा त्यांनी पाठ-पुरावा केला व शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. अंगणवाडी मुलांसाठी पोषण आहार, सुदृढ बालक स्पर्धा या सारखे उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला. त्यात गावातील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पळसंब गांव सुजलाम् सुफलाम् व्हाव बळीराजा सुखी व्हावा यासाठी भगीरथ प्रतिष्ठान सारख्या संस्थेचे योगदान मिळाले, यामध्ये शेतीस पूरक असे म्हणजेच लागवडीसाठी बि-बियाणे, कुक्कुट पालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय यासारख्या विविध शेती विषयक योजना या सारखे बळीराजाचे हित लक्षात घेऊन उपक्रम राबविण्यात यश मिळाले.

गावातील लोकांच्या आरोग्याची बाब लक्षात घेता गर्भवती महिलांन पासून वयोवृद्धान पर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत व्यक्तीशः प्रयत्न केला. अनेक संस्था संघटना यांनाच्या सहकार्याने आरोग्याच्या दृष्टीने विविध आरोग्य शिबिरे भरविण्यात आली.

कोरोना तथा कोविड १९ काळात जगावर संकट असताना पळसंब गावावर सुद्धा करोनाचा विळखा एवढा घट्ट होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. तरी देखील आरोग्य यंत्रणा तसेच गावातील ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गांव त्यातून बाहेर पडला.

आपल्या गावासाठी विविध सरकारी योजना राबवता येतील तेवढ्या राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी वेळप्रसंगी थेट शासन दरबारी पाठपुरावा चंद्रकांत गोलतकर यांनी स्वतः सरपंच म्हणून केला.

गावच्या देवस्थान कार्यात देखील त्यांनी तेवढ्याच जोमाने सात्त्विकतेने, आध्यात्मिकतेने सहभाग घेतला. देवस्थान ट्रस्टसाठी सर्वांच्या साथीने प्रयत्न करुन तो यशस्वी केला.
दलित वस्ती विकास निधी मिळवून त्या वस्तीची कामे सुद्धा पूर्णत्वास नेण्याचे कार्य सुद्धा माझ्या हातून पार पडले आणि या बौद्धवाडीचा तेही एक महत्वाचे पण एक घटक बनले.
संपूर्ण गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करून आणली. त्यासाठी प्रसंगी पक्षीय राजकारणही बाजूला ठेवले. गावात कोणत्याही कंपनीच नेटवर्कचा नव्हत या डिजिटल युगात गैरसोय होती त्यासाठी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्यामुळे गावात नेटवर्क आले.

सरपंच पदाच्या काळात मला पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते अनेक पक्षाचे नेते, विविध संघटना यांनी बहुमोल अशी साथ दिली असे चंद्रकांत गोलतकर आवर्जून सांगतात.

आपल्या सरपंच कार्यकालाचा आढावा घेताना स्वतः चंद्रकांत विजय गोलतकर हे जितके समाधानी आहेत तितकेच यापुढेही त्यांना आपला गांव व परिसरात ठोस असे काम करत रहायचे आहे हे ते विशेष नमूद करतात.
सरपंच पदाच्या शेवटच्या ३ महिन्यात त्यांची सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुक्याध्यक्षपदी निवड झाली ही त्यांच्या कार्याची घेतली गेलेली एक सर्वोच्च दखलच आहे. सरपंचपद हे 'समाज समन्वयाचे' वरदान असल्याचे चंद्रकांत गोलतकर यांनी नेहमीच कृतीने दाखवले आहे.

ग्रामदेवता आई देवी जयंती व श्री देव रवळनाथ यांचे ॠण मनाशी घट्ट ठेवून आपल्या शेतीच्या गावाला सतत आघाडीवर ठेवण्यासाठी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर नेहमीच प्रयत्नशील रहाणार आहेत. विज्ञान,तंत्रज्ञान व सोबतच अध्यात्मिक सज्ञान जपलेल्या चंद्रकांत गोलतकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

सुयोग पंडित (मुख्य संपादक)

error: Content is protected !!