26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘भारद्वाज’ नितीश..!

- Advertisement -
- Advertisement -

क्रीडा | विशेष : आपणा सर्वांना भारद्वाज हा पक्षी माहीत असेलच. भारद्वाजाचे वैशिष्ट्य असे की तो स्थानिक स्तरावर अख्खे वर्षभर काम करुन आपली उपजीविका करतो. त्याचे पंख मजबूत असतात परंतु छोटे असतात म्हणून तो फार लांब व लक्षणीय झेपा घेऊ शकत नाही परंतु इतर कुठल्याही पक्ष्यापेक्षा तो स्वावलंबी असतो कारण तो अथक थोडे थोडे काम करत रहातो.
हा पक्षी सकाळीच दिसणे हे अतिशय प्रसन्न शकुनाचे मानले जाते परंतु हाच पक्षी इतर काही विघातक मोठ्या व छोट्या पक्षांची अंडी नेस्तनाबूत करायचीही क्षमता ठेवतो.
त्याला ‘पक्ष्यांचा समाजही’ बर्यापैकी वचकून असतो कारण जर नजर हटली तर भारद्वाज त्या त्या झाडावर कब्जा करु शकतो.

अगदी तसाच एक ‘क्रिकेटींग भारद्वाज’ म्हणजे नितीश राणा भारतात आहे.
नितीश राणा हा २७ डिसेंबर १९९३ ला दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय काॅलनीत जन्मलेला अगदी एक सामान्य मुलगा. “हे पोरगं, क्रिकेट सोडून आयुष्यात काहीही करु शकणार नाही..” हे त्याच्या मातापित्यांसकट अख्या वस्तीला नीट माहीत होते परंतु तेच पोरगं खूप प्रतिभावान बनेल, आय पि एल मध्ये चमकेल, दिल्ली रणजी संघाचा कर्णधार बनेल हे मात्र कोणालाच पटले नसते. २०१५ साली, याच आपल्या मुलासाठी खुद्द चेतेश्वर पुजारा व विरेंद्र सेहवाग यांनी वेळात वेळ काढून ६ तास वलसाडच्या छोटेखानी मैदानावर व्यतीत केले हे ऐकून खुद्द त्याच्या घरच्यांना चक्कर यायची पाळी आली तेंव्हा मात्र ,”आपला नितीश खरेच प्रतिभावंत आहे व क्रिकेटमध्ये वरचा स्तर गाठू शकतो” हे घरच्यांना कळले.

तो एक अष्टपैलू खेळाडू आहे पण अगदी सहज शैलीचा परिणामकारक डावखुरा फलंदाज आहे.
आजच्या घडीला काॅलीन मुन्रो वगैरे सारख्या खेळाडूंसारखी त्याची स्थिती आहे…कारण मूळ राष्ट्रीय संघात आधीच भरपूर खेळाडू आपापली जागा बर्यापैकी मजबूत करुन आहेत.
पण नितीश सारखा खेळाडू नेहमी प्रसन्न असतो…दिसतो..व खेळतो.

भारतातील सूर्यकुमार यादव,दीपक हुडा किंवा प्रसंगी हार्दिक पांड्यासुद्धा मनोमन हे जाणून असतीलच की आपली कामगिरी खालावली तर ‘एक भारद्वाज नितीश’ कधीही राष्ट्रीय संघात स्थान घेऊ शकतो.
राष्ट्रीय संघाचे दार कायम ठोठावत रहाणार्या व तरिही कधीच कच न खाणार्या या अशा दुर्मिळ खेळाडुंपैकी एका “कणखर भारद्वाज” नितीशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अर्थात् भारद्वाजाचे दर्शन हे शुभशकुन व प्रसन्न असल्याने त्याचा कुठल्याही स्तरावरील खेळ व वावर हा प्रसन्नच असेल यात शंका नाही.

( सुयोग पंडित | मुख्य संपादक )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रीडा | विशेष : आपणा सर्वांना भारद्वाज हा पक्षी माहीत असेलच. भारद्वाजाचे वैशिष्ट्य असे की तो स्थानिक स्तरावर अख्खे वर्षभर काम करुन आपली उपजीविका करतो. त्याचे पंख मजबूत असतात परंतु छोटे असतात म्हणून तो फार लांब व लक्षणीय झेपा घेऊ शकत नाही परंतु इतर कुठल्याही पक्ष्यापेक्षा तो स्वावलंबी असतो कारण तो अथक थोडे थोडे काम करत रहातो.
हा पक्षी सकाळीच दिसणे हे अतिशय प्रसन्न शकुनाचे मानले जाते परंतु हाच पक्षी इतर काही विघातक मोठ्या व छोट्या पक्षांची अंडी नेस्तनाबूत करायचीही क्षमता ठेवतो.
त्याला 'पक्ष्यांचा समाजही' बर्यापैकी वचकून असतो कारण जर नजर हटली तर भारद्वाज त्या त्या झाडावर कब्जा करु शकतो.

अगदी तसाच एक 'क्रिकेटींग भारद्वाज' म्हणजे नितीश राणा भारतात आहे.
नितीश राणा हा २७ डिसेंबर १९९३ ला दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय काॅलनीत जन्मलेला अगदी एक सामान्य मुलगा. "हे पोरगं, क्रिकेट सोडून आयुष्यात काहीही करु शकणार नाही.." हे त्याच्या मातापित्यांसकट अख्या वस्तीला नीट माहीत होते परंतु तेच पोरगं खूप प्रतिभावान बनेल, आय पि एल मध्ये चमकेल, दिल्ली रणजी संघाचा कर्णधार बनेल हे मात्र कोणालाच पटले नसते. २०१५ साली, याच आपल्या मुलासाठी खुद्द चेतेश्वर पुजारा व विरेंद्र सेहवाग यांनी वेळात वेळ काढून ६ तास वलसाडच्या छोटेखानी मैदानावर व्यतीत केले हे ऐकून खुद्द त्याच्या घरच्यांना चक्कर यायची पाळी आली तेंव्हा मात्र ,"आपला नितीश खरेच प्रतिभावंत आहे व क्रिकेटमध्ये वरचा स्तर गाठू शकतो" हे घरच्यांना कळले.

तो एक अष्टपैलू खेळाडू आहे पण अगदी सहज शैलीचा परिणामकारक डावखुरा फलंदाज आहे.
आजच्या घडीला काॅलीन मुन्रो वगैरे सारख्या खेळाडूंसारखी त्याची स्थिती आहे…कारण मूळ राष्ट्रीय संघात आधीच भरपूर खेळाडू आपापली जागा बर्यापैकी मजबूत करुन आहेत.
पण नितीश सारखा खेळाडू नेहमी प्रसन्न असतो…दिसतो..व खेळतो.

भारतातील सूर्यकुमार यादव,दीपक हुडा किंवा प्रसंगी हार्दिक पांड्यासुद्धा मनोमन हे जाणून असतीलच की आपली कामगिरी खालावली तर 'एक भारद्वाज नितीश' कधीही राष्ट्रीय संघात स्थान घेऊ शकतो.
राष्ट्रीय संघाचे दार कायम ठोठावत रहाणार्या व तरिही कधीच कच न खाणार्या या अशा दुर्मिळ खेळाडुंपैकी एका "कणखर भारद्वाज" नितीशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अर्थात् भारद्वाजाचे दर्शन हे शुभशकुन व प्रसन्न असल्याने त्याचा कुठल्याही स्तरावरील खेळ व वावर हा प्रसन्नच असेल यात शंका नाही.

( सुयोग पंडित | मुख्य संपादक )

error: Content is protected !!