संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि .प शाळा कणकवली क्रमांक तीन येथे गणित दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून त्यांच्यामध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी या हेतूने शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित गाणी गणितीय रांगोळ्या भौमितिक आकृत्या संख्याज्ञान व स्थानिक किंमत कोन मापन कोनाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार अपूर्णांक गणितीय कोडी व गणितीय खेळ असे विविध साहित्य बनवले होते यावेळी इयत्ता सहावी सातवीच्या एकूण 52 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला तर इयत्ता चौथीच्या बारा विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका सौ अश्विनी परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ वर्षा करंबेळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत गणिताला आपला मित्र बनवा असे सर्वांना सांगितले.
यावेळी कोण होणार गणित चॅम्पियन ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेचे परीक्षण श्रीमती प्रतिभा कोतवाल सौ अक्षया राणे व श्री नितीन जठार यांनी केले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सम्यक चंद्रकांत पुरळकर याने गणित चॅम्पियन होण्याचा मान मिळवला तर भालचंद्र रवींद्र सावंत व वरद उदय बाक्रे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला विजेत्यांना यावेळी बक्षीसे देण्यात आली .
अशाप्रकारे शाळा कणकवली क्रमांक तीन येथे गणित दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.