24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा २०२२- २३ मध्ये निशा सोलकरला गोल्ड मेडल..!

- Advertisement -
- Advertisement -

निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या..

मसुरे | प्रतिनिधी :
महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता ११ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा 2022- 23 मध्ये 63 किलो मुलींच्या वजनी गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई श्री अभय चव्हाण तसेच मुंबईचे अध्यक्ष भास्कर करकेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत निशा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

निशा सोलकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हा,राज्यस्तरीय तसेच आंतरराज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेली आहेत. निशा सोलकर ही चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मुंबई परेल येथे प्रशिक्षण घेत असून तिला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार सर कॉलेज चा वतीने मनोज पाटील सर, निकिता पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच निशा हिला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. निशा सोलकर हीने विविध नृत्य स्पर्धेमध्ये सुधा प्रथम क्रमांक प्राप्त केले असून महिलांच्या दशावतार मध्येही तिने मोलाची कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल महर्षी दयानंद कॉलेज परेल च्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे. याबरोबरच रामगड, मसुरे गावातही तिचे कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या..

मसुरे | प्रतिनिधी :
महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता ११ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा 2022- 23 मध्ये 63 किलो मुलींच्या वजनी गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई श्री अभय चव्हाण तसेच मुंबईचे अध्यक्ष भास्कर करकेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत निशा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

निशा सोलकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हा,राज्यस्तरीय तसेच आंतरराज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेली आहेत. निशा सोलकर ही चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मुंबई परेल येथे प्रशिक्षण घेत असून तिला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार सर कॉलेज चा वतीने मनोज पाटील सर, निकिता पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच निशा हिला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. निशा सोलकर हीने विविध नृत्य स्पर्धेमध्ये सुधा प्रथम क्रमांक प्राप्त केले असून महिलांच्या दशावतार मध्येही तिने मोलाची कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल महर्षी दयानंद कॉलेज परेल च्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे. याबरोबरच रामगड, मसुरे गावातही तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!