तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मालवण आगारातून सुटणाऱ्या तारकर्ली देवबाग सकाळपासून रात्रीपर्यंत एसटीच्या फेऱ्या सुटत असतात . यापूर्वी मिनी बस असल्यामुळे देवबाग वरून आणि मालवण एसटी स्टँड वरून अलग अलग बसेस सोडल्या जात होत्या त्यामुळे प्रवाशांची व मुलांची कोणत्या ही प्रकारे गैरसोय होत नव्हती आता मोठ्या बसेस सोडत असल्यामुळे आणि त्याही इतर गावातून आल्यावर सोडत असून त्या सिंगल असल्याने बसेची वाट ताटकळत बघत राहावे लागते अन्यथा मिळेल त्या वाहनाने किंवा बाईक वाला मिळाल्यास त्यावर बसून ये जा करावे लागते.परंतु त्यातील काही फेऱ्या सकाळ, दुपार ,संध्याकाळ शाळेच्या आहेत . तसेच इतर फेऱ्या या मार्गावर धावत असल्याने त्या नियमित धावत नाहीत . शाळेच्या मुलांना व प्रवाशांना कित्येक वेळ स्टैंडवर अगर गावांमध्ये गाड्यांसाठी दोन दोन तास ताटकळत गाडीची वाट बघत बसून राहावे लागते यामध्ये एखादी फेरी अचानक बंद करून त्याच्या पुढील बस फेरी सोडली जाते तोपर्यंत वाहतूक नियंत्रक यांना विचारणा केली असता ते आगार प्रमुख यांच्याजवळ बोट दाखवितात तर ते आगार प्रमुख सुस्थितीत उत्तर देत नाहीत आपल्या मनाप्रमाणे समोरच्या प्रवाशांना उत्तरे देत असतात .काही वेळा वाहक व चालक असताना सुद्धा गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या जातात हा एक प्रकारचा प्रवाशांना आणि मुलांना त्रास देण्याचा हेतू आगार प्रमुख यांचा असावा .यावर कोणीही आवाज उठवत नसावेत. एक वेळा मुलांनी यावर आवाज करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी करण्यास आला नाही.
हा नुसता तारकर्ली देवबाग प्रवाशांचा विषय नसून मालवण आगारातून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या उशिराने सुटत असल्याने कित्येक वेळा लांब पडल्याच्या गाड्याही दोन दोन तीन तीन तास उशिरा सोडल्या जातात .यामुळे गाडीतून एखाद्या बस स्टॉपवर उतरल्यावर पुढे जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी नाहक खाजगी वाहतुकीदारांना भरमसाठ पैसा देऊन पुढील प्रवास करावा लागतो. हा भुर्दंड प्रवाशांना कोण देणार वेळ आणि पैसा याचा ताळतब मालवण आगारात नसल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असूनही प्रवाशी वर्गाच्या मागणीकडे वरिष्ठ अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.
मालवण आगारात सर्व मोठ्या बस असल्याने काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असतो अशावेळी वाहतूक नियंत्रण अगर आगार प्रमुख तारकर्ली देवबाग रस्त्यावर येण्या जाण्यासाठी वाहतुकीचे रहदारीचे कारण सांगितले जाते यामुळे गाड्या येण्यास विलंब होत असल्याने गाड्या उशिरां आल्यावर सुटणार आहेत परंतु याकरिता पर्यायी म्हणून या मार्गावर मिनी बस सोडण्यासाठी कित्येक वर्ष स्वतः सुरेश वापर्डेकर मागणी करत आहेत .परंतु यावर वाहतूक विभाग नियंत्रक कनकवली या मागणीचा वरिष्ठांकडे कोणत्या प्रकारे पत्रावर पाठपुरावा करत नाही यामुळेच प्रवासी व मुलांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे वेळेवर घरी पोहोचत नसल्याने पालक वर्गांना मोठ्या प्रमाणात टेन्शन येत असतं .मुलींना पास दिलेले असतात त्याचा महिन्यातून किती वेळा प्रवासाला उपयोग होतो याची चौकशी करावे लागेल शासन मुलींना मोफत पास देतात परंतु त्याचा काय उपयोग विद्यार्थी कोणीही मिळेल त्या वाहनाने आपलं घर अगर शाळा गाठण्याचा प्रयत्न करतात एस टी महामंडळाने या मार्गावर त्वरित चार तरी मिनी बस आणून काही गाड्या बाजारपेठे मार्ग सकाळ दुपार संध्याकाळ चालू ठेवून त्या तारकर्ली देवबागला ये जा करण्यासाठी मार्गस्थ करावे यामुळेच या मार्गावर जरी वाहतुकीची कोंडी झाली तरीही कोणतीही अडचण तारकर्ली देवबाग रस्त्यावर येणार नाही.तरी येत्या पंधरा दिवसात तारकर्ली देवबाग मार्गावरील प्रवाशांची होणारी गैरसोय आणि मिनी बस आणून व्यवस्था केली नाही तर आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालया समोर जन आंदोलन करून आमरण उपोषणला बसणार असे तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.