माजी आमदार परशुराम उपरकर यांचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : खास. विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्दची मागणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मायनिंग नकोच आहे परंतु सर्व राजकीय पुढाऱ्यांचे मायनिंग हे उत्पादनाचे साधन झाले. मायनिंगला पाठीशी घालण्याचे काम या लोकप्रतिनिधीकडून काम होत असून मायनिंगच्या विरोधात मनसेने यापूर्वी आवाज उठविला असतानादेखील कोणत्याही प्रकारची अधिकारी दखल घेत नसल्याने येत्या १५ ऑगस्टनंतर अपर जिल्हाधिकारी हटाव पर्यावरण बचाव असा मोर्चा आंदोलन मनसेच्या माध्यमातून उभारणार असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते.ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे डोंगर खचण्याचे प्रकार घडले आहेत .गाळेल येथे काल भेट दिली. त्याचप्रमाणे कळणे गावात भेट दिली असता जनतेचा लोकप्रतिनिधी विरोधात असलेला आक्रोश दिसून आला कळणे गावातील त्रासाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. कणकवली तालुक्यातील कासार्डे त्याप्रमाणे पियाळी या भागातही अशाच प्रकारची अवस्था आहे. पियाळी येथे 84 लाखाचा दंड होऊनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गौण खनिजाच्या 2013 च्या नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता अधिकारी काहीही माहिती देत नाहीत असे सांगताना उपरकर म्हणाले, विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्द करा ही मागणी लावून धरली मात्र जोपर्यंत आम्ही मागणी केल्याप्रमाणे सिंधुदुर्गातील अप्पर जिल्हाधिकारी हे ठाण मांडून आपल्या जागेवर आहेत तोपर्यंत मायनिंग रद्द होणार नाही. या मायनिँग समर्थक अधिकाऱ्यांना का हटविले जात नाही? सत्ताधारी यामध्ये सामील आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे यासाठी या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा या मागणीसाठी 15 ऑगस्ट नंतर मनसेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिला अप्पर जिल्हाधिकारी हटवा आणि पर्यावरण वाचवा ही आमची मागणी असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले.
मायनिंग विरोधात माझ्या 6 वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी वेळोवेळी आवाज उठविला मात्र मात्र सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी यांची हप्तेबाजी सुरू असल्याचे उपरकर म्हणाले. माय नेम विरोधात आता जनतेनेच पेटून उठण्याची वेळ आली आहे राज्यकर्ते आपल्या मदतीला येणार नाहीत याची जाणीव ठेवून जनतेने आंदोलन उभारावे असेही आवाहन यावेळी परशुराम उपरकर यांनी केले.