बांद्यातील माकडांचा उपद्रव रोखला जावा अशी नागरिकांची होतेय मागणी
बांदा : राकेश परब : बांदा कट्टा काँर्नर येथे बुधवारी चार वाजण्याचा सुमारास सुजाता फोटो स्टुडिओ मध्ये आत येऊन आरशा सारखे वस्तूचे माकडांनी नुकसान केले. यामध्ये स्टुडिओचे २ हजार रुपयांचे नुकसान झाले. वनविभागाने तातडीने या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक, व्यापारी ग्रामस्थामधून केली आहे. बाजारपेठे मध्ये ब-हाच व्यापारांचे नुकसान या माकडांनी केले असल्याच्या घटना घडल्या आहे.
बुधवारी ४ वाजण्याच्या सुमारास स्टुडिओचे मालक अजित दळवी काम करत असताना एका माकडाने प्रवेश करत आरसा व इतर सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मालक अजित दळवी यांनी माकडाला पळवून लावण्यासाठी पयत्न केले. पण मालक अजित दळवी यांच्या अंगावर माकड येईल या भीतीने घाबरले. यावेळी तेथील स्थानिक दुकानदार संतोष चिंदरकर, इशेद परेरा, सुशील देसाई,अरविंद मांजरेकर, अरुण पराजंपे मदतीने पळवून लावले. बांदा शहरात माकाडांचा मोठ्याप्रमाणात त्रास सुरु आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने माकडांचा वेळीच बदोबस्त करण्याची मागणी होत आहे.