24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पालक क्रिडा दिन साजरा करत नाबर प्रशालेच्या पालकांनी अनुभवले बालपण.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी पालकांनी शाळेला भेट देणे गरजेचे असते. आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख, शाळेची प्रगती, समस्या व त्यावर उपाय या सर्व गोष्टी या सार्‍यांच्या परस्पर सहकार्यातून होऊ शकतात हे लक्षात घेऊन व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल, बांदा प्रशालेत दरवर्षी ‘ पालक क्रीडा दिन’ हा आगळावेगळा उपक्रम गेली सात वर्षे घेतला जात आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नाबर प्रशाले पालक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री मनोज कामत, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. तनिशा सावंत, पालक प्रतिनिधी दिवाकर म्हावलंनकर, नवाज शेख, अश्विनी परुळेकर, राशी राणे, दिपक नाईक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई,उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रीडा मशाल पेटवून व श्रीफळ फोडून या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांसाठी संगीत खुर्ची, १०० मी. धावणे, २०० मी धावणे, रस्सीखेच, डॉज बॉल, क्रिकेट, स्लो सायकलिंग, लिंबू चमचा इत्यादी खेळ ठेवण्यात आले होते. पालकांनी या सर्व खेळांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ‘ बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे – 1)100 मी धावणे ( पुरुष) – प्रथम – श्री. दिलीप भिसे, द्वितीय – जनार्दन मालवणकर,तृतीय – निखिल खडपकर.2) 200 मी धावणे ( पुरुष) प्रथम – श्री. दिलीप भिसे, द्वितीय – श्री जनार्दन मालवणकर,तृतीय – श्री निखिल खडपकर. 3)100 मी धावणे (महिला) प्रथम – सौ. सिया गवस, द्वितीय – सौ पूजा चव्हाण, तृतीय – सौ वैष्णवी देसाई. 4)संगीत खुर्ची -सौ प्रथम – तृप्ती धुरी, द्वितीय – अदिती घोगळे, तृतीय – नीलम पटेल 5) स्लो सायकलिंग – प्रथम – श्री दिलीप भिसे, द्वितीय – जनार्दन मालवणकर, तृतीय – निखिल खडपकर 6) लिंबू – चमचा – प्रथम – सौ राशी राणे, द्वितीय – प्रियांका कोठावळे, तृतीय – सौ नमिता गाड. 7)डॉज बॉल – विजेता ग्रुप – श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता – श्री बांदेश्वर ग्रुप, 8) पासिंग द बॉल – विजेता ग्रुप – श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता – सुपर मॉम्स.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक, आभार प्रदर्शन प्रशांत देसाई यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी पालकांनी शाळेला भेट देणे गरजेचे असते. आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख, शाळेची प्रगती, समस्या व त्यावर उपाय या सर्व गोष्टी या सार्‍यांच्या परस्पर सहकार्यातून होऊ शकतात हे लक्षात घेऊन व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल, बांदा प्रशालेत दरवर्षी ' पालक क्रीडा दिन' हा आगळावेगळा उपक्रम गेली सात वर्षे घेतला जात आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नाबर प्रशाले पालक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री मनोज कामत, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. तनिशा सावंत, पालक प्रतिनिधी दिवाकर म्हावलंनकर, नवाज शेख, अश्विनी परुळेकर, राशी राणे, दिपक नाईक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई,उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रीडा मशाल पेटवून व श्रीफळ फोडून या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांसाठी संगीत खुर्ची, १०० मी. धावणे, २०० मी धावणे, रस्सीखेच, डॉज बॉल, क्रिकेट, स्लो सायकलिंग, लिंबू चमचा इत्यादी खेळ ठेवण्यात आले होते. पालकांनी या सर्व खेळांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ' बचपन आफ्टर पचपन' अनुभवले.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे - 1)100 मी धावणे ( पुरुष) - प्रथम - श्री. दिलीप भिसे, द्वितीय - जनार्दन मालवणकर,तृतीय - निखिल खडपकर.2) 200 मी धावणे ( पुरुष) प्रथम - श्री. दिलीप भिसे, द्वितीय - श्री जनार्दन मालवणकर,तृतीय - श्री निखिल खडपकर. 3)100 मी धावणे (महिला) प्रथम - सौ. सिया गवस, द्वितीय - सौ पूजा चव्हाण, तृतीय - सौ वैष्णवी देसाई. 4)संगीत खुर्ची -सौ प्रथम - तृप्ती धुरी, द्वितीय - अदिती घोगळे, तृतीय - नीलम पटेल 5) स्लो सायकलिंग - प्रथम - श्री दिलीप भिसे, द्वितीय - जनार्दन मालवणकर, तृतीय - निखिल खडपकर 6) लिंबू - चमचा - प्रथम - सौ राशी राणे, द्वितीय - प्रियांका कोठावळे, तृतीय - सौ नमिता गाड. 7)डॉज बॉल - विजेता ग्रुप - श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता - श्री बांदेश्वर ग्रुप, 8) पासिंग द बॉल - विजेता ग्रुप - श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता - सुपर मॉम्स.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक, आभार प्रदर्शन प्रशांत देसाई यांनी केले.

error: Content is protected !!